वैद्यकिय शिक्षण प्रवेशासाठी आता एक महाराष्ट्र एक मेरिट मंत्री अमित देशमुख यांच्याकडून विधानसभेत घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य विज्ञान विभागातंर्गत अर्थात वैद्यकिय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राज्यात ७०:३० ची प्रवेश पध्दत कार्यान्वित होती. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी वंचित रहात होते. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता एक महाराष्ट्र एक मेरिट यानुसार एनआयआयटी मार्फतच परिक्षा होणार असल्याची घोषणा वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली.

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. त्यांनी घोषणा करताच सर्व आमदारांनी बाके वाजवून स्वागत केले.

आरोग्य विज्ञान अर्थात वैद्यकिय शिक्षणाच्या प्रवेशासाठी ७०:३० हि कोटा पध्दत होती. या पध्दतीमुळे ७० टक्के स्थानिक विद्यार्थ्यांना तर ३० टक्के राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होते. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी यापासून वंचित रहात होते. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकच सुत्र आणि एकच मेरिट लागू करण्याच्या उद्देशाने एनआयआयटी या परिक्षेमार्फत जे उत्तीर्ण होतील त्यांनाच आता वैद्यकिय शिक्षणाला प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला जेन-झी मध्ये राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपाची झोप उडाली, आता मुली व महिलाही राहुल गांधींच्या विचारांशी सहमत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *