सुप्रिया सुळे याची मागणी, लाडक्या बहिणीच्या पाच हजार कोटींच्या वितरणाची चौकशी करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पैशांची उधळपट्टी

राज्य सरकारने  ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत कोणतीही लपवाछपवी न करता खरी आणि निर्दोष आकडेवारी जारी  करावी. या योजनेबाबतची श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी आणि ५ हजार  कोटींच्या अपात्र वितरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी एक्स या समाज माध्यमातून केली.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माहिती अधिकारातून समोर आलेली आकडेवारी महायुती सरकारचे धोरणात्मक गैरव्यस्थापन आणि जनतेच्या पैशांची झालेली उधळपट्टी उघड करणारी आहे. या प्रकरणात शासनाने जनतेच्या मालकीच्या पैशांचा विनियोग नेमका कसा केला जातोय याबाबत खुलासा करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माहिती अधिकाराखाली मिळालेल्या तपशीलानुसार योजनेतून तब्बल ८२ लाख लाभार्थी वगळण्यात आले आहेत. तर मंत्री महोदया ९२ लाख लाभार्थी वगळल्याचा दावा करतात. एकाच योजनेत हा १० लाखांचा घोळ नेमका कोणाचा? खरी आकडेवारी कोणती? आधार आणि आयकर प्रणाली उपलब्ध असतानाही १६ लाख अपात्र व्यक्तींना आणि अगदी पुरुषांच्याही खात्यात थेट पैसे जमा होईपर्यंत प्रशासकीय यंत्रणा काय करत होती? या अनागोंदी छाननी प्रक्रियेत अनेक खऱ्या, वंचित आणि गरजू महिलांचा हक्क तांत्रिक कारणांमुळे हिरावला गेला, अशी टीकाही केली.

About Editor

Check Also

एनसीएमसी NCMC कार्डधारकांसाठी आता BHIM Appद्वारे सहज करता येणार Top-up QR कोड स्कॅन करून काही क्षणांत कार्ड रिचार्ज; ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सुविधा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *