राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीट महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर …
Read More »रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? शेतकरी इतका हतबल कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे - जयंत पाटील
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »कर्मठ आणि अभ्यासू म्हणणारे फडणवीस यांच्या वक्तव्याचा अमित शाह यांच्याकडूनच त्रिफाळा तिलक महाराज कोण, शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरु केली? अमित शाह यांना यांना अचूक माहिती द्या
फार पूर्वी २०१४ पूर्वीच्या कोणी एके काळी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आणि भारत देशावरही होती. परंतु सत्ता राखण्यासाठी आणि जातीय समिकरणं कायम राखण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतल्याची चर्चा कधी ऐकिवात नाही. पण सध्या महाराष्ट्रात आणि भारताच्या केंद्रातील सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून खोट्या माहितीचा प्रचार सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी …
Read More »रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त
भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या …
Read More »प्रताप सरनाईक यांची ग्वाही, एसटीचा पगार दरमहा ७ तारखेला होण्याची जबाबदारी माझी यावेळी वेतन एकाच महिन्यात दोन वेळा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी घेतली जबाबदारी
यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल! असे नि: संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाने ₹१२० कोटी तातडीने दिले मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यांत उर्वरित वेतन जमा होणार
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नासाठी राजशिष्टाचाराला बगल देत मंत्रालयात वित्त सचिवांचा दालनात बैठक घेऊन वित्त सचिव सौरभ विजय यांच्या कडे एसटी महामंडळाचे विविध सवलती पोटी शासनाकडे थकीत असलेले ₹ १०७६ कोटी रुपये तातडीने दयावेत अशी आग्रही मागणी केली. यावेळी बोलताना मंत्री …
Read More »राज्यमंत्री अर्जून मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा भाजपाने राखला सन्मान भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळा संपन्न
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …
Read More »वंचित बहुजन आघाडीची सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात निदर्शने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करणार नाही म्हणत घोषणाबाजी
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपटातील काही दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत ती दृष्ट कट करण्याची सूचना केली. त्यातच पुण्यातील काही ब्राम्हण संघटनांनीही फुले चित्रपटात दाखविण्यात आलेल्या दृष्यांच्या विरोधात आक्षेप घेत आंदोलनेही केली. 📍फुले वाडा, पुणे निषेध आंदोलन सेन्सर बोर्डाच्या जातीवादी निर्णयाचा विरोधातील निषेध आंदोलनात वंचित बहुजन …
Read More »
Marathi e-Batmya