एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांकडून दररोज गुवाहाटीचा रस्ता धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या गटातील २०-२१ आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील सुहास कांदे यांचा व्हिडिओ …
Read More »पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आवाहन; वेळ गेलेली नाही, कुटुंबप्रमुख म्हणून काळजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. त्यानंतर आता शिवसेना नेमकी कोणाची खरी यावरून एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात अप्रत्यक्ष न्यायालयीन लढाई सुरु झाली. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे …
Read More »आणि शरद पवार यांनी थांबविले मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी उध्दव ठाकरे निघाले होते राजभवनावर
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक विषयावर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील संभ्रमावस्थेवर जैसे थे असे आदेश देत बंडखोर आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १२ जुलै पर्यंतची मुदत दिली. तर गटनेते पदी अजय चौधरी आणि प्रतोद पदावरील सुनिल प्रभू यांच्या नियुक्तीवरूनही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेसह शिवसेनेला नोटीस दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …
Read More »सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती, त्यांना बंडखोर मानत नाही ते १०० कॅरेट सोनं इतक्यात अविश्वास ठरावाची मागणी नाही -प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची झाली बैठक
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे आमदार बंडखोर असल्याचे आम्ही मानत नाही. तसेच ते १०० कॅरेट सोनं असल्याचे सांगत ते सर्वजण शिवसेनेतच आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांच्याकडून अद्याप भाजपाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही.भाजपा आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. पुढच्या दिवसांत ज्या काही घडामोडी घडतील त्यांच्यावर आमची नजर …
Read More »ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द
राज्यातील विविध १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, …
Read More »दिपक केसरकर यांचे खुले पत्र: भाजपाची भलामण, संजय राऊतांवर निशाणा हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी... बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!
बंडखोरांची बाजू मांडण्यासाठी बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी आज खुले पत्र लिहित शिवसेनेसाठी भाजपा कशी चांगली आहे आणि हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपाबरोबर एकत्र येणे चांगले (?) यासह भाजपा नेते कसे शिवसेनेवर टीका करत नाही आदींसह अनेक मुद्दे मांडत या सर्वामागे संजय राऊत कसे कट कारस्थानी आहेत याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचा …
Read More »ईडीच्या समन्सनंतर संजय राऊत यांचे आव्हान, मला अटक करा बंडखोरानंतर आता राऊत टार्गेट
राज्यात सत्ता परिवर्तनाच्या उद्देशाने शिवसेनेत एकप्रकारे फूट पाडण्याच्या अनुषंगाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतील ३९ आमदार आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेवून गुवाहाटी येथे तळ ठोकल्याने राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. तसेच राऊत …
Read More »राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ‘यांच्या’ अध्यक्षतेखाली समिती शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार अंमलबजावणी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी टप्या-टप्प्याने कार्यवाही सुरू असून याअंतर्गत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी काढून घेतली बंडखोरांची खातीः हे आहेत नवे मंत्री जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप
शिवसेनेसह राज्य सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदार मंत्र्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करत सूरत मार्गे गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबा होण्यास सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर जनतेची कामे रखडू नयेत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बंडखोर आमदार मंत्र्यांकडील खाती काढून …
Read More »दिपक केसरकर यांचे ठाकरे गटाला आव्हान, कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटाला मिळाले
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० बंडखोर आमदारांनी जरी गुवाहाटीत तळ ठोकलेला असला तरी मुळ पक्षालाच अर्थात उध्दव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यामुळे एकाबाजूला उध्दव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना परतण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांनी थेट आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला …
Read More »
Marathi e-Batmya