चाचा चौधरी पुस्तकातून पंतप्रधान मोदी, चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाही राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवण्यासाठी जाहिरातीवर सुमारे चार हजार शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु त्यातून मोदींची प्रतिमा बनली ना लोकप्रियता वाढली त्यामुळे आता त्यांनी चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे काम सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरु झाले आहे. चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न मोदींनी कितीही केला तरी ते चाचा नेहरु यांची जागा घेवू शकत नाहीत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

पालघर ईव्हीएम मशीनप्रकरणाची सखोल चौकशी करा

पालघर लोकसभा निवडणूकीमध्ये खाजगी गाडीमध्ये ईव्हीएम मशीन मिळाले याचा अर्थ काहीतरी गडबड झालेली असून याची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

पालघर लोकसभा निवडणूकीमध्ये मतदान प्रक्रियेनंतर एका खाजगी गाडीने ईव्हीएम मशीन नेण्याचा प्रकार समोर आल्यानंतर यामध्ये काहीतरी पाणी मुरते आहे असा संशय नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

खाजगी गाडीतून ईव्हीएम मशीन नेण्याबाबत जिल्हाधिकारी कितीही खुलासा करु देत परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सरकारी गाडीऐवजी एका खाजगी गाडीचा वापर केला आहे. ईव्हीएम खाजगी गाडीतून नेण्याचा प्रकार झाल्याने यातूनच काहीतरी गडबड झाली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका, सत्ताधारी प्रधानांचं असं‌ समर्थन करत आहे जणू प्रधान निष्पाप मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसु पाहणाऱ्यांना धडा शिकवला गेला

जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, सत्ताधारी आमदार – खासदार धर्मेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *