कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय

कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या राज्यातील ६० कारागृह ग्रंथालयांसाठी प्रत्येकी एक बुककेस आणि एक बुकरॅक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहातील बांधवांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांना वाचनासाठी संधी मिळावी, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते.

राज्यातील प्रत्येक कारागृहातील बांधवांना वाचनाची संधी उपलब्ध होऊन वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी, त्यातून त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल होण्याकरिता, या बांधवांचे सामाजिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात चांगल्या सुधारणा होण्याच्या दृष्टीने ग्रंथालय संचालनालयाच्या सहकार्याने बुककेस आणि बुकरॅक मिळावे, असे कळविण्यात आले होते.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील ग्रंथालयांना कसा घेता येईल यासाठी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या १३ डिसेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानला विनंती करून राज्य शासनाकडून त्याचा पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार राज्यातील ६० कारागृह ग्रंथालयांना प्रत्येकी बुककेस आणि बुकरॅक मंजूर करण्यात आले असून लवकरच कारागृह ग्रंथालयास पुरवण्यात येणार आहे.

या सामाजिक उपक्रमामुळे ग्रंथालये केवळ पुस्तके ठेवण्याची जागा न राहता, ज्ञानप्रद आणि आकर्षक वाचन केंद्र म्हणून विकसित होतील. राज्यातील वाचनसंस्कृती वृद्धिंगत होईल यासाठी इतर ग्रंथालयांनीही अशा सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, नागपूर, विदर्भ आणि मध्यभारताच्या विकासाचे इंजिन म्हणून नागपूर विमानतळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांच्या उपस्थितीत नागपूर विमानतळ विकास हस्तांतरण

नागपूर व परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *