कँनल पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारची ३ कोटींची मदत पालक मंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
पुणे येथील दांडेकर पूलाजवळील कँनल फुटून आलेल्या पुरामुळे या भागातील नागरीकांना पुर परिस्थितीचा सामना करावा लागला. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे या पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ३ कोटी रूपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी दिली. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या भागात आलेल्या पुरामुळे ९८ घरे उध्दवस्त झाली आहेत. तर ४०० ते ५०० घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांचे पंचनांमे करण्याचे काम सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक महिन्याचे धान्य ही नुकसानग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गासाठी करार
शहरातील शिवाजी नगर ते हिंजवडी दरम्यानच्या तिसऱ्या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरु होणार असून या प्रकल्पासाठी राज्य सरकारने टाटा-सिमेन्स या कंपनीशी करार केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २० टक्के आणि राज्य सरकारकडून २० टक्के असे मिळून ४० टक्के उपलब्द करून देण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ६० टक्के रक्कम टाटा आणि सिमेन्स या कंपनीकडून उभारण्यात येणार आहेत. या तिसऱ्या मार्गासाठी ८ हजार ३१३ कोटी रूपयांच्या खर्चासही राज्य सरकारने मान्यता दिल्याचे बापट यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे हिंजवडी ते शिवाजी नगर दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होवून एकावेळी ३० हजार प्रवाशी प्रवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *