पवारांच्या वाढदिनामिमित्त राज्यातल्या दिव्यांग आणि स्पर्धा परिक्षार्थींसाठी दोन नवे अॅप नव्या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातल्या प्रत्येक दिव्यांगाना देणगीदारांच्या माध्यमातून आवश्यक असलेली मदत मिळावी यासाठी महाशरद (mahasharad), स्पर्धा परिक्षार्थीं व अनुसूचित जातींसाठीच्या असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी (Barti) असे दोन मोबाईल अॅण्ड्राईड अॅप लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
हे दोन्ही अॅप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून लाँच करण्यात येणार आहे. या अॅपचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाशरद या अॅपच्या माध्यमातून राज्यातील २९ लाख दिव्यांगाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दिव्यांगाना आवश्यक असणारी यंत्रे किंवा तंत्रज्ञान देणगीच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखाद्या संस्थेला किंवा व्यक्तीला दिव्यांगासाठी काही मदत करावयाची असेल तर या अॅपच्या माध्यमातून देता येणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर एखाद्या अंध दिव्यांगाना डोळे हवे असतील तर या अॅपच्या माध्यमातून ती दिव्यांगाना थेट देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या दिव्यांगाकडे स्वतःचा स्मार्ट फोन नाही आणि त्यांची नोंद नाही अशांसाठी दिव्यांग विभागाकडून गावोगावी जावून त्यांची माहिती गोळा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अनुसूचित जातीतील व्यक्तींसाठी सामाजिक न्या विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची समग्र माहिती बार्टी या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धा परिक्षा देणाऱ्या परिक्षार्थींसाठी ई क्लासरूमची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच केजी टू पीजी विद्यार्थ्यांसाठी ई-क्लास रूम आणि ई-लायब्ररीही उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *