शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, आजची सुनावणी पुर्ण पण… वेळापत्रक जाहिर करून त्यानुसार सुनावणी घेणार

राज्यातील महत्वाच्या असा सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीप्रश्नी महत्वाच्या असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांचे वकिल आणि काही आमदार प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित होते. तसेच आज एकाच दिवसात सुनावणीचा निर्णय अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु आज सुनावणीत मोठा निर्णय होण्याऐवजी पुढील सुनावणीचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले. याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिंदे गटाच्या आमदाराची भूमिका मांडली.

यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात आदेश दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांकडून याप्रकरणी सुनावणी होत नसल्याने ठाकरे गटातील आमदारांकडून टीका केली जात होती. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी पहिली सुनावणी पार पडली. तर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये तातडीची दुसरी सुनावणी बोलावली. दुपारी पार पडलेल्या आजच्या सुनावणीचा निर्णय अध्यक्षांनी राखून ठेवला असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, आमच्या गटाच्या वकिलांना काही पुरावे दाखल करायचे आहेत, त्यावर सुनावणी झाली पाहिजे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळापत्रक ठरवण्यात येणार असल्याने आजचा निर्णय राखून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

परंतु, ऑनलाईन सुनावणीबाबत जे स्टेटमेंट येत आहेत यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली, म्हणून दोन्ही वकिलांच्या संमतीने आजचा निर्णय राखून ठेवतोय, पुढच्या वेळेस वेळापत्रकानुसार सुनावणी घेऊ असं अध्यक्षांनी आजच्या सुनावणीत सांगितलं. विधानसभा अध्यक्ष प्रेस नोटद्वारे सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करू शकतात. प्रत्येकाचा युक्तीवाद ऐकून घेण्याचं अध्यक्षांनी अशंतः मान्य केलं असल्याची माहितीही संजय शिरसाट यांनी दिली.

दरम्यान, ठाकरे गटाने सर्व याचिका एकत्र करून एकच सुनावणी घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. तर त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या याचिकेवर आक्षेप घेतला असून प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी अशी मागणी करत प्रत्येक याचिकेबाबत पुरावे दिले जातील असा युक्तीवाद शिंदे गटाने सांदर केला असून पुढील सुनावणी १३ ऑक्टोंबरला होणार असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.

About Editor

Check Also

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *