नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा “तो” अहवाल संजय राऊत यांच्याकडून जाहीर ट्विट करत केला उघड

काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांकडूनही त्याचा तपास करण्यात आला. परंतु त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रश्नी सुनावणी झाली. मात्र त्यावर न्यायालयाने याप्रकरणी तुर्तास जैसे थे असे आदेश दिले. त्यामुळे त्यांच्या खासदार की बाबत अंतिम निर्णय होवू शकला नाही.
परंतु मागील काही दिवसांपासून शिवसेना विरूध्द राणा दांम्पत्य असा संघर्ष निर्माण झाल्यानंतर आणि आज राणा दांम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवसेना प्रवक्त तथा खासदार संजय राऊत यांनी त्या संदर्भातील अहवाल पुढे आणला आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाण पत्राची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हिंदू-मोची समाजाचे सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या अहवालावर मुंबई पोलिस उपायुक्तांची सही व शिक्काही आहे.
सदरची माहिती करणारे कागद पत्र संजय राऊत यांनी ट्विट करत अशा बोगस खासदारांकडून हनुमान चालिसा ऐकायचे का? असा खोचक सवाल केला आहे. आणि सोबत त्या पोलिस तपासातील अहवातील निष्कर्ष असलेली प्रत जोडण्यात आली आहे.
मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अद्याप निवडणूक आयोगाला कोणतीही कारवाई करता आली नाही की त्यांची खासदारकी रद्दबातल करता आली नाही.
दरम्यान, नवनीत राणा यांनी शिवसेनेला चांगलेच जेरीला आणल्याचे दिसून येत आहे. परंतु शिवसेनेकडून राणा दांम्पत्याला धोरणात्मक पध्दतीने प्रत्युत्तर देण्याऐवजी त्यांना बळाने उत्तर देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र शिवसेनेला त्यात सध्या तरी यश आल्याचे दिसून येत नाही.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *