राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, प्रचारकांच्या संख्येत केली वाढ प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून ४० करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत केली होती. ‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २०२५’ मधील परिच्छेद २६ मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे.

त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

About Editor

Check Also

उदय भानू चिब यांची मागणी, IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्रा. सुर्यनारायण दुल्लांना तत्काळ अटक करा राहुल गांधी यांचा साहिलच्या पालकांशी फोनवरून संवाद, काँग्रेस साहिलच्या कुटुंबियांसोबत, साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल.

आयआयटी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला संस्थेतील प्राध्यापकांनी जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *