दिवाळीच्या तोंडावर लालपरीच्या भाड्यात वाढ २१ ते ३१ ऑक्टोबर, दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ

दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि. २०.१०.२०२२ व २१.१०.२०२२ रोजीच्या मध्यरात्री ००:०० नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल.

ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.

तथापी, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

About Editor

Check Also

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे आदेश, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा सर्वंकष आराखडा तयार करावा वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आल्यानंतर दिले निर्देश

राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) अत्याधुनिक व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी सर्वंकष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *