केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना कोरोनाची लागण ट्विट करून दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी विलगीकरणात रहावे आणि स्वत:ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्विट द्वारे केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जवळपास १३ मंत्र्यांना आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढही होत आहेत. त्यामुळे राज्यात अधिकाधिक निर्बंध लावण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने विचार सुरु केला आहे. त्यातच महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्यामध्ये कदाचीत डॉ.भारती पवार या पहिल्याच असतील.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *