उद्योग कर्जासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत अनुसूचित समाजाच्या वैयक्तिक अर्जदारांनी

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

अनुसूचित समाजाच्या जातीतील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी मादगी या १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदार या कर्जासाठी अर्ज करू शकतात. विहित कालावधीत जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, या पत्त्यावर अर्ज व मूळ दस्तावेजासह स्वत: साक्षांकित करून सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२- २६५91124 अथवा rmslasdcbandra@gmail.com यावर संपर्क साधावा, असे कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

About Editor

Check Also

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रामदास आठवले यांचा सत्कार कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *