वाराणसी न्यायालयाचा निर्णयः ग्यानवापी मस्जिदीतील तळघरात हिंदू पुजेला परवानगी

जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ग्यानवापी मस्जिदीच्या जागी पूर्वी हिंदू देवस्थान होते या मागणीवरून सध्या न्यायालयीन लढाईत काही हिंदू देवस्थानची बाजू सक्षम ठरत आहे. त्यातच भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या सर्व्हेक्षणात मस्जिदीच्या तळघरात पूर्वी हिंदू धर्मियांचे मंदिर असल्याचे पुरावे पुढे आल्याने या तळघरात हिंदू पध्दतीने पुजा-अर्चा करण्याची परवानगी वाराणसी जिल्हा न्यायालयाने आज दिली.

वाराणसी येथील मंदिराच्या जागेवर मस्जिद उभारण्यात आल्याचा आरोप जमिनीच्या मालकांच्या वारसांनी केला होता. तसेच मुळ जमिनीवर मंदिरच उभारण्यात आल्याचे सिध्द करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याने संशोधन करावे अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार संशोधन केले असता मस्जिदीच्या खाली असलेल्या तळघरात हिंदू देवस्थानमध्ये असलेली काही प्रतिकात्मक चिन्हे भींवर चितारण्यात आल्याचे उघडकीस आले. यासंदर्भातील माहिती भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या संशोधनात पुढे आल्याने अखेर त्या तळघरात हिंदू पध्दतीने पूजा-अर्जा करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देत सात दिवसाच्या आत तळघरात जाऊन पुजा करण्यासंदर्भात सुविधा निर्माण कराव्यात असा आदेशही वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिले.

त्याचबरोबर वाराणसी जिल्हा न्यायालयाने मस्जिदीच्या जागेत असलेला तळघराचा आणि दक्षिण बाजूकडील जागेचा ताबा घेण्याचे आदेश १७ आणि २७ जानेवारी रोजी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले होते. त्यानुसार हिंदूधर्माशी संबधित पुरावे पुढे आल्यानंतर पुढील सात दिवसाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालने हिंदूच्या पुजे-अर्चेच्या अनुषंगाने योग्य ती तरजविज करावी असे आदेश देत ही याचिका निकाली काढली.

About Editor

Check Also

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रामदास आठवले यांचा सत्कार कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *