१२ वी निकालाबाबत उच्च व माध्यमिक मंडळाची घोषणा; उद्या दुपारी जाहिर

राज्यात लोकसभा निवडणूकीचा माहोल असल्याने आणि महाराष्ट्रातील पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली जात आहे. या घडामोडीतच १२ वी परिक्षेच्या निकालाबाबत मात्र उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतलेल्या परिक्षांच्या निकालाबाबत अधिकृत घोषणा केली. उद्या दुपारी १ वाजल्यापासून १२ वी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे.
१२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांना परिक्षेत मिळालेले गुण अधिकृत संकेतस्थळावर पाह्यला मिळणार आहेत. तसेच त्याची प्रिंट आऊटही काढता येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे,

१)  maharesult.nic.inhttp://maharesult.nic.in

२)  https://hscresult.mkcl.org

३)  https://mahahsc.mkcl.org

४)  www.mahahsscboard.in

५)  https://resultdigilocker.gov.in

६)  https://results.targetpublications.org

या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना आले गुण पाहता येणार असून तसेच त्याची प्रिंट आऊटही काढता येणार आहे. त्याचप्रमाणे digilocker app मध्ये digital मार्कशिटही संग्रहीत करून ठेवण्याची सोयो उपलब्ध करून ठेवता येणार आहे.

www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची सांख्यिंकीय माहिती उपलब्ध होणार आहे.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल असेही उच्च व माध्यमिक मंडळाने आपल्या प्रसिध्दी पत्रकात जाहिर केले आहे.

याशिवाय ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी) परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या विषयातील गुण आणि विशिष्ट विषयात मिळालेले गुणांची पडताळणी, व उत्तर प्रतिकेच्या छायाप्रती, पुनर्मुंल्याकनासाठी संबधित विभागीय मंडलाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://varification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी बुधवार दिनांक २२-५-२०२४ ते ५-६-२०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. त्यासोबत ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही मंडळाकडून एका पत्रकान्वये जारी करण्यात आली आहे.

बोर्डाचे हेच पत्रक

About Editor

Check Also

हवाला व्यवहार करणारे जम्मू आणि काश्मीरमध्ये ८ हजार मुल अकाऊंट्सचा शोध ८ हजार बँक खात्यांचा सुरक्षा यंत्रणांकडून शोधली

सुरक्षा संस्थांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तथाकथित “मुल अकाउंट्स” चे वेगाने वाढणारे नेटवर्क उघड केले आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *