भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील रडार सिस्टीम केली उद्धवस्त पाकिस्ताने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर प्रत्युत्तर दाखल कारवाई

भारताने गुरुवारी म्हटले की, पाकिस्तानने “उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर” लाहोर येथील “हवाई संरक्षण प्रणाली अर्थात रडार” “निष्क्रिय” करण्यात आले.

७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत, भारताने आपला प्रतिसाद केंद्रित, मोजमापात आणि परिस्थिती आणखी चिघळू न देणारी कारवाई केल्याचा उल्लेख केला होता. पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले नव्हते हे विशेषतः नमूद करण्यात आले होते. भारतातील लष्करी लक्ष्यांवर कोणत्याही हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा पुनरुच्चार करण्यात आला,” असे भारताच्यावतीने पत्रकार परिषदेत सांगितले होते.

त्यानंतरही पाकिस्तानने ७-८ मे च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे लक्ष्य एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींनी निष्क्रिय केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांवर सापडत आहेत जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे आहेत, असे भारताकडून सांगण्यात येत आहे.

आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तान सारखेच तीव्रतेने प्रत्युत्तर देत  लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

असे समजते की नवीनतम इस्रायली HAROPs – भारतीय हवाई दलाचे एक प्रकारचे मानवरहित लढाऊ हवाई वाहन – पाकिस्तानी लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी भारताने वापरले असावे. हे लक्ष्याच्या जवळ हवेत लटकू शकतात आणि निर्देशित केल्यावर स्वतःला नष्ट करून त्यावर हल्ला करू शकतात. पाकिस्तानच्या आयएसपीआरनेही हॅरोप्सचा वापर केल्याचा दावा केला आहे.

आदल्या दिवशी, सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले होते की, लाहोर किंवा पाकिस्तानच्या इतर भागात कोणत्याही लष्करी लक्ष्यावर त्यांच्याकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला जाईल.

पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि जड तोफांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली, असे पीआयबीच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले. पाकिस्तानी गोळीबारामुळे तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. येथेही, पाकिस्तानकडून मोर्टार आणि तोफांचा मारा थांबवण्यासाठी भारताला प्रत्युत्तर द्यावे लागले.

जर पाकिस्तानी सैन्याने त्याचा आदर केला तर भारतीय सशस्त्र दलाने तणाव न वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

About Editor

Check Also

विधानसभा निवडणूकीत पराभव झाला तरी बार कौन्सिलच्या निवडणूकीत टीएमसी विजयी २३ पैकी १५ जागी टीएमसीचे उमेदवार विजयी भाजपाला अवघ्या तीन जागा

टीएमसीच्या (TMC) वकिलांच्या आघाडीचे सदस्य संजय बर्धन यांनी सांगितले की, ही निवडणूक जिल्हा न्यायालयांमध्ये घेण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *