विशेष बातमी

इराणमधील तणावपूर्ण स्थिती ; भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायजरी केली जारी

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही …

Read More »

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर न्यूयॉर्कच्या तुरुंगात रवानगी त्यांची पत्नी आणि मुलांनाचीही तुरुंगात रवानगी

अमेरिकन सैन्याने काराकासमध्ये केलेल्या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी न्यूयॉर्कमधील एका नजरकैद केंद्रात हलवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दक्षिण अमेरिकन नेत्याला ताब्यात घेण्यासाठी आणि देशावर व त्याच्या प्रचंड तेलसाठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छाप्याचे आदेश दिले होते. पदच्युत …

Read More »

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला लष्कराने घेतले ताब्यात अनेक स्फोटांनी व्हेनेझुएला हादरला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दावा केला की, काराकासवर झालेल्या ‘मोठ्या प्रमाणावरील हवाई हल्ल्यां’नंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा व्हेनेझुएलाच्या राजधानीत अनेक स्फोटांनी देश हादरल्यानंतर काही तासांनी समोर आला, ज्यामुळे देशात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ६ पदरी कॉरिडॉरला मंजूरी सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात ३७४ कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च १९,१४२ कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या …

Read More »

प्रियांका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्राचा राजस्थानात साखरपुडा अविवा बेग हिच्याशी नव वर्षाच्या सुरुवातीला होणार

राजधानीत राजकीय घडामोडींची चर्चा सुरू असताना, एका खाजगी कौटुंबिक सोहळ्याची तयारी शांतपणे सुरू आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा त्याच्या दीर्घकाळाच्या मैत्रीण अविवा बेगसोबत साखरपुडा करणार आहे, असे कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. हा साखरपुडा राजस्थानमध्ये दोन ते तीन दिवसांचा एक साधा समारंभ …

Read More »

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे मंगळवारी सकाळी ८० व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. बीएनपीने जारी केलेल्या निवेदनानुसार, खालिदा झिया यांचे ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात सकाळी ६ वाजता निधन झाले. त्या एका महिन्याहून अधिक काळ तेथे उपचार घेत होत्या. निवेदनात म्हटले …

Read More »

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तथा पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा हिंदूस्तान अर्थात भारत आता “लिंचिस्तान” (लिंचिंगची भूमी) बनत चालला असल्याचे मत व्यक्त करत केंद्र सरकार आणि भाजपावर टीका …

Read More »

आता जीमेलची आयडी- पत्ता बदलता येणार, गुगल कडून नवे फिचर जुना जीमेल कायम ठेवून नवा जीमेल आयडी बनविण्याची परवानगी

तुम्हाला कधी तुमचा जीमेल पत्ता बदलायचा आहे का? कदाचित तुम्ही तुमचे खाते काही वर्षांपूर्वी तयार केले असेल, आणि आता तो जीमेल पत्ता व्यावसायिक वाटत नसेल? तर, असे दिसते की गुगल लवकरच तुम्हाला तुमचे खाते कायम ठेवून तुमचा जीमेल आयडी बदलण्याची परवानगी देणार आहे. याचा तुमच्यासाठी काय अर्थ असू शकतो, ते …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीला विज्ञान क्षेत्रासाठी पुरस्कार

वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात …

Read More »

वोलोदिमिर झेलेन्सी यांनी व्यक्त केली व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूची इच्छा नाताळच्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ख्रिसमसच्या संध्याकाळी युक्रेनच्या जनतेला संबोधित करताना, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे नाव न घेता, त्यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त केली. ख्रिसमसच्या काळात रशियाने युक्रेनवर हल्ले केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरली. ‘स्वर्ग उघडतो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनियन दंतकथेचा संदर्भ देत वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले, “प्राचीन …

Read More »