विशेष बातमी

दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे चित्र अनावरण रेल्वे मंत्रालयात करण्यात आले

अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या भारताच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या पहिल्या झलकचे अनावरण नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात करण्यात आले असून, यातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एक झलक पाहायला मिळत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या इमारतीच्या गेट क्रमांक ४ वर हाय-स्पीड ट्रेनचे चित्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात ट्रेनची रचना दर्शविण्यात आली आहे. “देशातील पहिल्या …

Read More »

सौदी अरेबियाच्या मदतीसाठी पाकिस्तानने पाठविली ८ हजार सैनिक आणि लढाऊ विमाने सौदी अरेबियासोबत संरक्षण कराराअतंर्गत पुरवली साहित्य

पाकिस्तानने सौदी अरेबियामध्ये परस्पर संरक्षण कराराअंतर्गत ८,००० सैनिक, लढाऊ विमानांची एक तुकडी आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील वरिष्ठ लष्करी सूत्रांनी सोमवारी रॉयटर्सला दिली. अमेरिका-इराण युद्धात मुख्य मध्यस्थ म्हणून काम करत असताना इस्लामाबाद रियाधसोबत लष्करी सहकार्य वाढवत आहे. या तैनातीला तीन सुरक्षा अधिकारी आणि दोन सरकारी …

Read More »

जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांची स्पष्टोक्ती, तामिळनाडूतील परिस्थिती वेगळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या राजकीय यशाचा तुलनात्मक अभ्यासावेळी केले वक्तव्य

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी, त्यांच्या राजकीय प्रवासाची तुलना विजय यांच्या जलद उदयाशी केली जात असताना, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील राजकीय परिस्थिती एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, असे वक्तव्य केले. विषेश म्हणजे पवन कल्याण हे आंध्र प्रदेशामधील तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत. तर तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील अभिनेते …

Read More »

राजधानी एक्सप्रेस रेल्वे गाडीला पहाटे लागली आगः उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जीवीतहानी मात्र कोणतीही नाही

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात रविवारी पहाटे तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला भीषण आग लागली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६८ प्रवाशांना घेऊन जाणारा डबा १५ मिनिटांत रिकामा करण्यात आला आणि यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या १२४३१ क्रमांकाच्या ट्रेनच्या बी-१ डब्यात पहाटे ५.१५ च्या सुमारास आग …

Read More »

राहुल गांधी यांची परखड मागणी, मोदी जी देश आपसे कुछ सवाल पुछ रहा है, जवाब दो धर्मेद्र प्रधान यांना मंत्रिपदावरून काढून टाका

वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची असलेल्या नीट परिक्षा २०२६ च्या पेपर लीक झाल्याने संपूर्ण देशभरातील २२ लाख तरूणांचे भविष्य वाया गेले. या प्रकाराने संपूर्ण देशभरातून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. या परिक्षेचा पेपर फुटल्याने आता हि परिक्षा या चालू महिन्यात होणार नाही तर ती पुढील महिन्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय …

Read More »

मुख्यमंत्री विजय यांनी ज्योतिषाचीच केली ओएसडी म्हणून नियुक्ती, आघाडीचा विरोध अखेर मुख्यमंत्री विजय यांची माघार

युतीच्या भागीदारांकडून आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या प्रतिस्पर्ध्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी त्यांचे ज्योतिषी, रिकी राधन पंडित वेत्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली. व्हेट्रीवेल यांना मुख्यमंत्र्यांच्या खात्यात ओएसडी म्हणून बढती दिल्यानंतर या गोष्टी झाल्या.  या निर्णयामुळे …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीला बीजींगमध्ये दाखल अमेरिका-चीन दरम्यान शिखर बैठक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेसाठी बीजिंगमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत प्रमुख व्यावसायिक नेत्यांचे शिष्टमंडळ होते आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संबंध स्थिर करण्यासाठी नवीन दबाव आणला जात होता. डोनाल्ड ट्रम्प हे इलॉन मस्क आणि जेन्सन हुआंग यांचा समावेश …

Read More »

केरळमधील सत्ता स्थापनेवरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, आता तुम्ही वायनाड विसरा, दिला इशारा के सी वेणुगोपाल यांच्या निवडीवरून व्यक्त केली नाराजी

केरळमधील डाव्या आघाडीला पराभूत करत काँग्रेसने बहुमताचा आकड़ा सहज पार करेल इतरी सदस्यसंख्या जिंकली, मात्र केरळ विधानसभेचा निकाल जाहिर होऊन 10 दिवस होत आले तरी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून योग्य व्यक्तीचे नाव अद्याप अंतिम करण्यात आले नाही. त्यातच केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी के सी वेणूगोपाल यांचे नाव अंतिम कऱण्यात आल्यावरून केरळवासियांनी एका …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर राहुल गांधी यांची टीका हे सगळे अपयशाचे पुरावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या या आवाहनाला त्यांनी ‘अपयशाचा’ पुरावा म्हटले आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्यास सांगितले—सोने खरेदी करू …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे वर्क फ्रॉम होमचे संकेत, इंधन-सोने खरेदी न करण्याचे आवाहन म्हणे परकीय चलन वाचवा, वर्षभरासाठी सोने खरेदी नको

मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी दरवाढ होण्याची भीती वाढत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धती पुन्हा सुरू करण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि देशाला परकीय चलन वाचविण्यात मदत करण्यासाठी एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करणे टाळण्याचे आवाहन …

Read More »