विशेष बातमी

राजनाथ सिंह यांची टीका, सबका बॉस म्हणून घेणाऱ्या अमेरिकेला भारताची प्रगती बगवत नाही पण भारत मोठी शक्ती उदयाला आल्याशिवाय राहणार नाही

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या उपाययोजनांवर टीका करत आरोप केला की, काही शक्ती भारताच्या जलद वाढीबद्दल अस्वस्थ आहेत. अमेरिकेला “सबका बॉस” असे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, भारतात बनवलेले उत्पादने अधिक महाग व्हावीत जेणेकरून जगाने ती खरेदी करणे थांबवावे यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. परंतु आता कोणतीही शक्ती भारताला एक …

Read More »

अमेरिकेच्या टॅरिफवर नितीन गडकरी म्हणाले, त्यांच्या आर्थिक प्रभावामुळे त्यांची दादागिरी आम्हाला सर्व संसाधने मिळाल्यानंतर आम्ही दादागिरी करणार नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जागतिक स्तरावर “दादागिरी” (धमकावणे) करणारे देश त्यांच्या आर्थिक प्रभावामुळे आणि तांत्रिक बळामुळे असे करू शकतात. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा भारत अमेरिकेकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शुल्काचा सामना करत आहे. शनिवारी नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) बोलताना नितीन गडकरी यांनी भारताला …

Read More »

कर्नाटक निवडणूक आयोगाचे राहुल गांधी यांना पत्र, कागदपत्रे सादर करा आरोपाची समर्थन करणारी कागदपत्रे पाठवा

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एका मतदाराने दोनदा मतदान केल्याच्या त्यांच्या आरोपाचे समर्थन करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. पत्रात, निवडणूक आयोगाच्या सीईओने राहुल गांधी यांच्या अलीकडील पत्रकार परिषदेचा उल्लेख केला आहे, जिथे त्यांनी त्यांच्या सादरीकरणातील काही कागदपत्रे “ईसी …

Read More »

अमेरिकेत जन्मलेल्या मुलांचे नागरिकत्व धोक्यात, नियमात बदल अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांचे भवितव्य धोक्यात

अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ने एक प्रमुख धोरण अपडेट जाहीर केला आहे ज्यामध्ये स्पष्ट केले आहे की, बाल स्थिती संरक्षण कायदा (CSPA) वय गणनेच्या उद्देशाने, व्हिसा आता परराष्ट्र विभागाच्या व्हिसा बुलेटिनच्या अंतिम कारवाई तारखा चार्टवर आधारित “उपलब्ध” मानला जाईल. १५ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यानंतर दाखल …

Read More »

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची १५ ऑगस्टला भेट भारताकडून स्वागत पण चर्चा होणार युक्रेन-रशिया युद्धाची

भारताने शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे होणाऱ्या बैठकीचे स्वागत केले आणि आशा व्यक्त केली की, यामुळे युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा अंत होण्यास मदत होईल. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने, १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्का येथे होणाऱ्या बैठकीसाठी अमेरिका आणि रशियन …

Read More »

हवाई दलाचे प्रमुख ए पी सिंह यांची स्पष्टोक्ती, पाच जेट, एक विमान ऑपरेशन सिंदूरमध्ये पाडले ऑपरेशन सिंदूरवरून भारतीय हवाई दलाकडून पहिल्यांदाच कबुली

भारतीय हवाई दलाचे प्रमुख ए पी सिंह यांनी आज एका मोठा खुलासा करत म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि हवाई देखरेखीसाठी डिझाइन केलेले आणखी एक मोठे विमान नष्ट केल्याचा गौप्यस्फोट केला. बेंगळुरू येथे एअर चीफ मार्शल एल …

Read More »

मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून केंद्राच्या एनईपीला एसईपी धोरणाने प्रत्युत्तर केंद्राच्या धोरणात त्रिसुत्री भाषेचे धोरण तर राज्याच्या धोरणात द्विभाषेचे धोरण

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी शुक्रवारी कोट्टूरपुरम येथील अण्णा सेंटेनरी लायब्ररी ऑडिटोरियममध्ये राज्य शिक्षण धोरण (एसईपी) चे अनावरण केले आणि ते केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला (एनईपी) एक स्पष्ट पर्याय म्हणून मांडले. नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी २०२२ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती मुरुगेसन यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. …

Read More »

कर्नाटकच्या सरकारला राहुल गांधी यांचे आवाहन, महादेवपुरातील मतचोरीची चौकशी करा कर्नाटकातील निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे मागितली होते पुरावे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, निवडणूक आयोग (EC) इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ शेअर करण्यास नकार देऊन “मोठा गुन्हा लपवत आहे”. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कथित चोरीला आळा घालण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. बेंगळुरू येथील एका …

Read More »

अजित डोवाल यांची माहिती, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल खरेदी प्रकरणी टॅरिफ आकारल्यानंतर पहिल्यांदाच भारत दौरा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येतील. तसेच व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्याच्या सध्या तारखा निश्चित केल्या जात आहेत, अशी माहिती अजित डोवाल यांनी गुरुवारी मॉस्को दौऱ्यात केली. रशिया सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्याशी झालेल्या चर्चेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, नवी दिल्ली आगामी …

Read More »

उपराष्ट्रपती पदाचा एनडीए उमेदवार भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा ठरविणार संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार अंतिम करतील, १२ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. संसद भवनात झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपाध्यक्ष …

Read More »