Tag Archives: अजित पवार

विजय वडेट्टीवार यांची टीका, “मोठ मोठे आकडे सांगुनिया थकले, दिले नाही काही बळीराजा”

अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. परंतु अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सरकारने शेतकऱ्यांना ठोस काही दिले नाही. हिवाळी अधिवेशनाकडे बळीराजाचे डोळे लागलेले असताना ट्रीपल इंजिन सरकारने जुन्याच घोषणा नव्याने करून शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. शेतकऱ्यांना न्याय न देता अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला असल्याची टीका विधानसभा …

Read More »

नाना पटोले यांची मागणी,… अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या

नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांसाठी हे अधिवेशन होत असते. सभागृहात विदर्भातील विषय मांडले पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही. केवळ दीड आठवड्याचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवावा अशी मागणी केली पण आता अंतिम आठवडा प्रस्ताव आला आहे. विदर्भावर अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, समृद्धीलगत १३ कृषी अणूऊर्जा आधारीत कांद्याची महाबँक

राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं …

Read More »

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, …

Read More »

मराठा- कुणबी आरक्षणासाठीचा शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला. विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, ….भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आजही

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ताकारणात अंतिम शब्द टाकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्यातील खेळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घटन करताना शरद पवार यांनी जाहिररित्या इशारा दिला. मात्र तो इशारा नेमका त्यांचे पुतणे अजित पवार यांना की भाजपाच्या नेत्यांना …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, …आर्थिक हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना सहकार्य करणार

शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने आवश्यक बाबतीत तातडीने कठोर पावले उचलण्यात यावीत. वित्त व नियोजन आणि सहकार विभागाने यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

अजित पवार यांचे सारथीच्या फेलोशिप संदर्भात मोठे वक्तव्य

राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. मुळात यासाठी १३८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरकारने जाहिरात काढताना विद्यार्थ्यांच्या मर्यादा संख्येचा त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे २०२३ च्या बॅचमधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, भारतीय जुमला पार्टी महाराष्ट्राच्या विरोधात

भाजपाने आईस (इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडी) चा केलेला गैरवापर. जे भ्रष्ट आहेत, त्यांच्या पार्टीचे आहेत, ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या विरोधात केला नाही. तर जे भ्रष्ट नाहीत, त्यांच्या विरोधात करतात आणि त्यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवतात, हे आपण उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील सुडाचे राजकारण पाहत आहोत असा आरोप शरद पवार …

Read More »

ऑनलाईन गेमिंगना आणि या शर्यतींचा समावेश आता जीएसटी करप्रणालीत

जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची (अश्वशर्यती) व्याख्या तसेच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेले जीएसटी सुधारणा विधेयक आज मंजूर करण्यात आले. जीएसटी सुधारणा विधेयक सभागृहात मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यानंतर कराच्यासंदर्भातील निर्णय जीएसटी कौन्सिलकडून घेतला जातो. …

Read More »