Tag Archives: भाजपा

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास सरकारची मान्यता

मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, ….भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आजही

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ताकारणात अंतिम शब्द टाकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्यातील खेळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घटन करताना शरद पवार यांनी जाहिररित्या इशारा दिला. मात्र तो इशारा नेमका त्यांचे पुतणे अजित पवार यांना की भाजपाच्या नेत्यांना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, घर देता आले नसल्यानेच उद्धव ठाकरे यांचा मोर्चा

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पा अदानी कंपनीला देण्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता भाजपाच्या विरोधाच चांगलेच दंड थोपडले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मोर्चावरून चांगलाच निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात धारावी पुनर्विकासाचे काम सुरु झाले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारच्या काळात या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला,… मग तुम्ही कशासाठी अदानीचे बुट चाटतय

मध्यंतरी सरकारची एक योजना सुरु झाली. शासन आपल्या दारी खरं तर हे सरकार अदानीच्या दारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ५० खोके एकदम ही ओके अशी घोषणा तुमची आहे. मी काही दिली नाही. त्या बोक्यांना आता खोके कमी पडले की काय धारावी आणि मुंबई गिळायला बसले अशी खोचक टोला राज्यातील …

Read More »

सुधाकर बडगुजर म्हणाले, व्हिडीओ मॉर्फ.., सुषमा अंधारे यांचा प्रत्यारोप, त्या पार्टीत भाजपा नेतेही…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख सुधाकर बडगुजर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे फोटोग्राफ सादर करत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधण्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्या …

Read More »

नितेश राणे यांचा आरोप, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी

मागील काही महिन्यांपासून राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात चांगलेच वाक् युध्द रंगलेले आहे. तसेच या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. तसेच विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर …

Read More »

आदिवासी बिर्‍हाड मोर्चेकऱ्यांचा प्रश्‍न थेट विधानसभेत … देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन …

Read More »

कायमस्वरूपी संक्रमण शिबिरातील सदनिका प्रकल्पबाधितांकरिता देण्याबाबत मार्ग काढू

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील (एसआरए) बाधितांसाठी कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची (पीटीसी) आवश्यकता असते. एमएमआरडीए, महानगरपालिका आदी यंत्रणांच्या विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांसाठी (पीएपी) देखील सदनिकांची आवश्यकता आहे. तथापि एसआरएला संक्रमण शिबिरांची आवश्यकता असल्याने यामधील सदनिका प्रकल्पबाधित शिबिरामध्ये रुपांतरित करून देण्याबाबत लवकरच बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे …

Read More »

जयंत पाटील यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी वाटप करारासाठी…

दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक सरकार महाराष्ट्राकडे पाणी मागते. त्यानुसार महाराष्ट्र सरकार पाणी कर्नाटकला देते. मात्र राज्याला पाणी आवश्यक असल्यास कर्नाटककडे पाणी मागितले जाते. तेव्हा कर्नाटक कडून सहजरीत्या मिळत नसल्याचा अनुभव आहे. त्यासाठी कर्नाटकसोबत कायम स्वरुपी पाणी वाटप करार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी …

Read More »

महादेव अॅप प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी माहिती

‘महादेव ॲप’ या ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या विरोधात विविध राज्यात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »