चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, घर देता आले नसल्यानेच उद्धव ठाकरे यांचा मोर्चा

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पा अदानी कंपनीला देण्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता भाजपाच्या विरोधाच चांगलेच दंड थोपडले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मोर्चावरून चांगलाच निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात धारावी पुनर्विकासाचे काम सुरु झाले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारच्या काळात या धारावीच्या कामाला सुरुवात झाल्यानेच उद्धव ठाकरे यांना मोर्चा काढावा लागत आहे अशी टीका नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीनंतर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरील टीका केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जनतेला मूर्ख बनवण्याकरिता मोर्चे काढायचे. या मोर्च्याने काही फरक पडणार नाही आणि जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसल्याचे सांगत राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईचा विकास केला जात आहे. धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावी त्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे. मात्र उद्धव ठाकरे आता धारावी मुद्दायर राजकारण करत आहे अशी टीकाही केली.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांना धारावीसाठी रस्त्यावर उतरावे लागले हे खर म्हणजे त्यांनी केलेले पाप असल्याचे टीका करत उद्धव ठाकरे यांचा मोर्चा हा फुसका बार आहे, मुंबईचा मूड आता महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे घाबरलेले ठाकरे आज मोर्चा काढत आहेत. हा शिल्लक राहिलेल्या पार्टीचा मोर्चा आहे. महाराष्ट्र मागे गेला त्याचे कारण म्हणजे मुंबईचा विकास झाला नाही. गरिबांना घर मिळाली नाही. स्वतः ची निश्क्रियता झाकण्यासाठी असे मोर्चे काढतात. ते पाप लपवण्यासाठी बवंडर करायचे काम करत असल्याचा आरोपही केला.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही. जनतेला कन्फ्यूज करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. त्यांच्या बोलण्याला लोक कंटाळले आहेत अशी टीकाही केली.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *