Tag Archives: अजित पवार

अजित पवार यांचे जयंत पाटील यांना प्रत्युत्तर, “…येवढं लक्षात ठेवा…” कविता आणि शेरोशायरीतून प्रत्युत्तर देत सोबत येण्याची घातली साद

अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान जयंत पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर कवी विं दा करंदीकर यांच्या कवितेचा संदर्भ देत आणि शेरोशायरीतून यथेच्छ टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनीही शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनाही विं दा करंदीकर यांच्या कवितेतून प्रत्युत्तर देत शेरोशायरीतून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काही काळ …

Read More »

अजित पवार यांची अखेर कबुली, बाबा तुम्ही म्हणता तसे महाराष्ट्र … छोट्या राज्यांचा विचार केला तर तुम्ही म्हणता तेच बरोबर

मागील तीन दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरु आहे. विविध राजकिय पक्षांच्या आमदारांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेऊन अर्थसंकल्पातील तरतूदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विरोधकांच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याचे निरसन अजित पवार यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे …

Read More »

अजित पवार यांचे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर, हा निर्धाराचा अर्थसंकल्प हा अजित दादाचा वादा जिल्हा विकास निधीतून प्रत्येक जिल्ह्याला ई-पिंक रिक्षा

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्यास आवश्यक निधी, …

Read More »

अजित पवार यांची ग्वाही, टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणीपुरवठा करणार ३० जूननंतरही टँकर सुरु ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना

पाऊस न पडल्याने राज्याच्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. राज्यातल्या एकाही तालुक्यात किंवा खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा …

Read More »

हसन मुश्रीफ यांची माहिती, पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली माहिती

पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …

Read More »

लोणावळा भुशी धरण दुर्घटना; पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

लोणावळा येथील भुशी धरण धबधब्यात, पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले. …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, … विनामूल्य जमीन उपलब्धतेसाठी शेती महामंडळाकडे प्रस्ताव द्या स्थानिक स्वराज्य संस्थानी प्रस्ताव सादर करण्याचे दिले आदेश

गावठाण विस्तार, शासकीय घरकूल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी अटी व शर्थींच्या अधीन राहून …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पुढील तीन महिन्यांत निर्णय विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले उत्तर

राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

अजित पवार यांची ग्वाही, कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणार नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला दिली माहिती

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहे. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये …

Read More »

नीट पेपर फुटीवरून काँग्रेसने राज्य सरकारला धरले धारेवरः अजित पवार यांनी केली भूमिका स्पष्ट नाशिकमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रे काढून नीट परीक्षा दिली, सरकार झोपा काढत आहे का?

विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय …

Read More »