Tag Archives: काँग्रेस

सचिन सावंत यांचा इशारा, राहुल गांधींबद्दल मनोज जरांगेंनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह, मर्यादा पाळा मनोज जरांगेंच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा, आरक्षणाचा लढा खालच्या पातळीवर आणू नये

मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा मुख्यमंत्र्यांना सुरजागडच्या खाणीतून मिळणाऱ्या मलईतच जास्त रस

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजपा युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमित शाह आले पण शेतक-यांना मदतीबाबत शब्दही नाही सहकार क्षेत्रावर कब्जा मिळवण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना

महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा निर्धार, १० ऑक्टोबरचा ओबीसी महामोर्चा होणारच राज्य सरकारने ओबीसी संघटनाच्या बोलावलेल्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्याने महामोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ओबीसी संघटना ठाम

राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे.हा शासन निर्णय रद्द करावा तसेच २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या दोन मागण्या आज ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात कार्यशाळा हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन राऊत यांचेही मार्गदर्शन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण, या विषयावर प्रांताध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मिठी नदीच्या निविदा प्रक्रियेत सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन तीन वर्षे मनपाचा हेतू वाईट होता का? मनपाचे स्पष्टीकरण म्हणजे घोळ असल्याची मान्यता

मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांवर मुंबई महानगरपालिकेने माध्यमांना दिलेले स्पष्टीकरण हे या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची मान्यता असून या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल,भारतातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला कोलिंबियाच्या ईआयए विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना केला हल्लाबोल

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे प्रतिपादन केले. कोलंबियाच्या ईआयए EIA विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना, राहुल गांधी यांनी “रचनात्मक त्रुटी” या मुद्द्यावर प्रकाश टाकला आणि …

Read More »

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार.. शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मनुस्मृती व बंच ऑफ थॉटचे दहन करून आरएसएस विसर्जित करा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या व दिवाळीच्या आधी कर्जमाफी करा

संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा उपरोधिक टोला, महात्मा गांधींना शरण जाणे हा आरएसएसचा वैचारिक पराभव संविधान सत्याग्रह पदयात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद, पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम खडकीत

महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला.परंतु द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडली हे सर्वांना माहित आहे, पण बदनामी मात्र महात्मा गांधींची करण्यात आली परंतु आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण …

Read More »