सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …
Read More »अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे सरकारला पत्र, केवळ चहापानाचा फार्स अंबादास दानवे यांचा खडा सवाल, विसंवाद आहे म्हणायचे आणि संवादही साधायचा नाही
अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्यावतीने विरोधी पक्षातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत प्रथेप्रमाणे दरवेळी प्रमाणे राज्य सरकारने यावेळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र एकाबाजूला कायदेशीर तरतूदींचे पालन करायचे नाही दुसऱ्याबाजूला विरोधकांच्या सूचनांचा आदरही करायचा नाही मग …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, राज्यात जंगलराज, महिला- मुली सुरक्षित नाहीत… मुलींची छेड काढणा-यांच्या अटकेसाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनात जावे लागते ही सरकारसाठी शरमेची बाब
राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली, त्यांच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. आरोपींना अटक होत नाही म्हणून खडसे यांना पोलीस स्टेशनला जाऊन ठिय्या द्यावा लागतो, हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे निदर्शक आहे. राज्यातील …
Read More »काँग्रेस विधिमंडळ पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर: अमित देशमुखांवर जबाबदारी विधानसभा उप नेते पदी आ. अमिन पटेल, सचिवपदी आ. डॉ. विश्वजित कदम, विधानपरिषदेत गट नेतेपदी आ. सतेज पाटील
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, वाहनधारकांची लूट थांबवा इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी तिप्पट शुल्क का? जीएसटी का लपवला? सवाल
भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडत नाही. जनता आधीच महागाईने त्रस्त असताना आता वाहनधारकांच्या खिशावर सरकारची नजर पडली आहे. वाहनांच्या हायसेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क नाही तर ‘जिझिया’ करच आहे असा आरोप …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, विमान शोधणारे पोलिस बलात्काऱ्याला अद्याप जेरबंद…लाजीरवाणी गोष्ट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस
पुणे येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणेसह महाराष्ट्र हादरले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राजकिय वर्तुळातून उमटत असून पुणे पोलिस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांच्या कार्यक्षमतेवर आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ‘घाशीराम कोतवाल करो सो कायदा’ महाराष्ट्रात चालणार नाही पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी , फ्रेंच कंपनी सिस्ट्राने एमएमआरडीएवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा पारदर्शक चौकशीसाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करा
भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचाराचे विक्रम दररोज उघड होत आहेत. आता फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एमएमआरडीएवरील हे आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे मुंबईची जगभरात नाच्चकी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा व आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर ४ मार्चला महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेसचे आंदोलन.
भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची …
Read More »पंतप्रधान मोदी यांना टॅग करत मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काढून घेतली लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची सरकारी आकडेवारीच दाखवून दिली
लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा देशातील जनतेने भाजपाला मतदान करत पुन्हा केंद्रातील सत्तेत विराजमान केले. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सबका साथ सबका विकासचा नारा दिला खरा मात्र या सरकारने एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप काढून घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना …
Read More »
Marathi e-Batmya