Tag Archives: नरेंद्र मोदी

केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीचा गुड गर्व्हनन्सचा इंडेक्स गुंडाळला आता थेट पुढील वर्षी करणार जाहिर

केंद्र सरकारने गुड गव्हर्नन्स इंडेक्स २०२३, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे द्विवार्षिक रँकिंग सुशासन सप्ताह (१९ डिसेंबर ते २५ डिसेंबर) दरम्यान जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता पुढील आवृत्ती २०२५ साली प्रकाशित करण्याची योजना आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर २०१९ रोजी सुशासन दिन म्हणून पाळण्यात …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?… धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट

देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …

Read More »

काँग्रेसची केंद्राकडे मागणी, डॉ मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अत्यंविधीसाठी वेगळी जागा द्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय केंद्र सरकारला लिहिले पत्र

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यविधी आणि त्यांचे स्मारक उभारण्यासाठी दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर, जिथे अनेक माजी पंतप्रधानांचे स्मारक आहेत, तेथे वेगळी जमिन मिळावी यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहीत मागणी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सूत्रांनी सांगितले. …

Read More »

आरएसएसशी बिघडलेले संबध सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून ख्रिसमस गोवा, केरळ आणि ईशान्य भारतातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील मुख्यालयात ख्रिसमस सेलिब्रेशनच्या कार्यक्रमात ख्रिश्चन समुदायाच्या कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ला केलेले संबोधन लक्षणीय आहे. जर्मनीतील अलीकडील ख्रिसमस मार्केट हल्ल्याचा आणि श्रीलंकेतील २०१९ च्या इस्टर बॉम्बस्फोटांचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाचा वापर केला आणि “सबका साथ, सबका विकास” ही त्यांची घोषणा ख्रिश्चन …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केन बेतवा राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी वाघांच्या जंगलातून जात धरणाचे काम, काँग्रेसची टीका

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) केन-बेतवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. केबीएलबी KBLP ने केन नदीचे पाणी यमुनेच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीत सोडण्यात येणार असल्याची कल्पना केली …

Read More »

कुवैतचा यंदाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे पंतप्रधान मोदी यांना प्रदान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कार

कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार कुवैतचे शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ नागरी पुरस्कार आज पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी त्यांचे कुवैती …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, डॉ आंबेडकरांना पराभूत करण्यात भाजपा-आरएसएसही अमित शाह यांना इशारा, आदरानेच बोला अन्यथा याद राखा

राज्यसभेत भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते अमित शाह यांना इशारा देत म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला …

Read More »

अमित शाह यांच्यावरील टिकेला पंतप्रधान मोदींचे एक्सवरून उत्तर,… काळा इतिहास काँग्रेसकडून अमित शाह यांना लक्ष्य केल्याने मोदींकडून पलटवार

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पलटवार, देशात तेव्हा इलेक्टड नव्हे तर सिलेक्टड सरकार… पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावरही टीका

राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात काँग्रेसचे नेत्या प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाने केलेल्या राजकिय चुकांवर भाष्य करत लोकशाहीचा ढाचा प्रयत्न भाजपावर हल्लाबोल केला. तसेच विरोधी बाकावरील इतर नेत्यांनीही भाषण करत राज्यघटना आणि देशातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावर ताशेरे ओढले. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

तीन कायद्यात सुधारणा करत वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंजूरी ५० टक्के राज्यांच्या मंजूरीची आवश्यकता नाही

भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी वन नेशन वन इलेक्शन ‘एक राष्ट्र, एक मतदान’ योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळाने पीटीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले. मार्चमध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने टप्प्याटप्प्याने लोकसभा …

Read More »