Tag Archives: परराष्ट्र मंत्रालय

यूकेकडून होर्मुझ सामुद्रधुनी सुरु करण्यासंदर्भात भारतासह ३५ देशांना केले आमंत्रित परराष्ट्र सचिव विक्रम सचिव उपस्थित

युनायटेड किंगडमने (यूके) संघर्षग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात बहुपक्षीय चर्चेसाठी भारतासह ३५ देशांना आमंत्रित केले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीचे प्रतिनिधित्व करत आहेत. “यूकेने होर्मुझ सामुद्रधुनीवर चर्चेसाठी भारतासह अनेक देशांना आमंत्रित केले आहे. …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांचा खुलासा, भारतातील १.४ अब्ज लोकांच्या इंधन ऊर्जेचा प्रश्न महत्वाचा अमेरिकेने केलेल्या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

भारताने गुरुवारी (५ फेब्रुवारी, २०२६) ठामपणे सांगितले की, आपल्या १.४ अब्ज लोकांसाठी ऊर्जा अर्थात इंधन सुरक्षा सुनिश्चित करणे हा पेट्रोलियम उत्पादने मिळवण्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा गाभा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेत केलेली ही टिप्पणी, भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवल्याच्या वॉशिंग्टनच्या दाव्याला उत्तर म्हणून आली …

Read More »

इराणमधील तणावपूर्ण स्थिती ; भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायजरी केली जारी

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही …

Read More »

व्हेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. व्हेनेझुएलातील सद्यस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, जे भारतीय नागरिक …

Read More »

पीटर नवारो यांची टीका परराष्ट्र खात्याने फेटाळून लावली परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिले प्रत्युत्तर

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांच्या अलीकडील विधानांना जोरदारपणे नकार दिला आणि त्यांना “चुकीचे” आणि “दिशाभूल करणारे” म्हटले. MEA चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “आम्ही पीटर नवारो यांनी केलेली चुकीची आणि दिशाभूल करणारी विधाने पाहिली आहेत आणि अर्थातच, आम्ही ती …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढीव टॅरिफवर भारताकडून प्रसिद्धी पत्रकाने उत्तर राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आवश्यक कृती करेल

भारताने भारतीय आयातीवर दुप्पट कर आकारण्याच्या युनायटेड स्टेट्सच्या निर्णयाचा निषेध केला आहे आणि या निर्णयाला “अयोग्य, अन्यायकारक आणि अवाजवी” म्हटले आहे. अधिकृत निवेदनात, नवी दिल्लीने हे स्पष्ट केले की वॉशिंग्टनच्या वाढत्या व्यापाराच्या दबावादरम्यान राष्ट्रीय हित आणि ऊर्जा सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी ते “आवश्यक सर्व कृती” करेल असे प्रसिद्धी पत्रक जारी केले …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर चीनचा विरोध टॅरिफला विरोध करत ब्रिक्सचा पर्याय योग्य

ब्रिक्स गटात सामील होण्याविरुद्ध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांना दिलेल्या अल्टिमेटमला उत्तर देताना चीनने म्हटले आहे की हा गट कोणत्याही देशाला लक्ष्य करत नाही. तसेच बीजिंग जबरदस्तीच्या मार्गाने शुल्काचा वापर करण्यास विरोध करतो असेही म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्याला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, …

Read More »

अमेरिकाने घातले बेकायदेशीररित्या स्थलांतरण करणाऱ्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यावर निर्बंध मानवी तस्करी आणि आणि बेकायदेशीर प्रकरणी भारतीय ट्रॅव्हल कंपन्या सहभागी

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या भारतीय ट्रॅव्हल एजन्सीजच्या मालकांवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध जाहीर केले. बेकायदेशीर स्थलांतर नेटवर्क नष्ट करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मानवी तस्करी आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केले आहे. विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी एका निवेदनात म्हटले …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, काश्मीर प्रश्न द्विपक्षियच व्यापारावरून शस्त्र झाली नसती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर

भारत आणि पाकिस्तान दोघांनीही शत्रुत्व संपवण्यास सहमती दर्शविल्याशिवाय व्यापार थांबवण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करताना, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंगळवारी (१३ मे २०२५) सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांशी व्यापाराबाबत कधीही चर्चा झाली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारताने भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील राष्ट्राध्यक्ष …

Read More »

विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या की, पाकिस्तान नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करतेय विनाकारण ड्रोण हल्ले पाकिस्तानकडून सुरू

काल रात्रीपासून भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला संघर्ष आणखी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्कराने भारताविरोधात केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने त्या विरोधात प्रत्युत्तर दिले. त्यासंदर्भात दिवसभरात घडलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी याही …

Read More »