Tag Archives: महिला व बाल कल्याण मंत्री

१ मे स्थापना दिनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना गिरीश महाजनांना नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब

नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना १ मे महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनाचा मान भाजप नेते मंत्री गिरीश महाजन व अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दोघांच्या नावावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे. …

Read More »

राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला …

Read More »

आदिती तटकरे यांचे निवेदन, लाडकी बहिणीच्या २१०० रूपयांबाबत मुख्यमंत्री निर्णय़ घेतील राज्य सरकारवरील वाढत्या टीकेवरून महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री तटकरेंचे निवेदन

लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी मध्य प्रदेशाच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना जाहिर करण्यात आली. तसेच दर महिन्याला १५०० रूपये देत विधानसभा निवडणूकीच्या कालावधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रूपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले. त्यानुसार राज्यातील महिलांनी मोठ्या …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – राज्यपाल

केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे …

Read More »

आदिती तटकरे यांचे आवाहन, राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कामास गती द्या महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार आहे. १८ जिल्ह्यात अहिल्या भवनचे कार्य सुरू असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्या भवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालय येथील दालनात महिला व बालकांच्या विविध समस्या …

Read More »

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत मिळणार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य …

Read More »

आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितले, कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार पैसे लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थींची होणार छाणनी

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुतीला सत्तेत पुन्हा एकदा स्थान मिळावे याकरिता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली. मात्र निवडणूक होताच माझी लाडकी बहिण योजनेच्या मानधनात वाढ होणार की नाही यावरून शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या. त्याचबरोबर ही योजना अशीच पुढे राहणार का कि त्यातही छाणनी करण्यात येणार का यासह अनेक …

Read More »

दीपक केसरकर यांची स्पष्टोक्ती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना

शालेय विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या दुर्देवी घटना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून या उपाययोजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून लवकरच त्यातील निष्कर्षांवर चर्चा करुन उपाययोजनांचे सशक्तीकरण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी, ३५ हजार कोटीची तरतूद पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने …

Read More »

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे …

Read More »