Tag Archives: विजय वडेट्टीवार

समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सतेज बंटी पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत शिक्षक भारती संघटनेचे प्रमुख तसेच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्तचा राजीनामा देत नव्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. मात्र आता स्वतःच स्थापन केलेल्या पक्षाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज बंटी पाटील आदी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट

विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहांनी लुटले, काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ लुटीची माहिती… मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले आहेत. राज्यातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्राला …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, आता गौतम अदानीचा फोटोही महापुरुंषासोबत…. चंद्रपूरातील शाळा अदानी फाऊंडेशनला चालवायला देण्याचा सरकारचा निर्णय

राज्यातील जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या शाळा आता खाजगी कंपन्यांना हस्तांतरीत करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला. आधीच राज्यातील अनेक ठिकाणचे भूखंड आणि संपूर्ण मुंबई शहरातील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड आधीच अदानीच्या घशात राज्यातील सरकारने धारावी पुर्नवसनच्या नावाखाली घातले असताना आता शाळाही अदानीच्या घराशात घालण्याची तयारी सुरु केली …

Read More »

भूखंड प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, ती ट्रस्ट माझ्या मालकीची नाही… विरोधकांच्या टीकेनंतर बावककुळे यांचा खुलासा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी रूपयांची जमिन स्वस्त दरात दिल्याप्रकरणी विरोधकांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी ती ट्रस्ट माझअया मालकीची नसल्याचा दावा केला. बावनकुळे अध्यक्ष असलेल्या नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, ..पण सत्तेत येताच शेतकऱ्यालाच उद्धवस्त करण्याचे धोरण रमेश चेन्नीथला यांची टीका,... फक्त पैसा वसुली एवढेच काम

भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, परस्पर उमेदवार जाहिर करायला परवानगी नाही संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी टोकले

नुकतेच श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीगांदा येथील शिवसेना उबाठाचा उमेदवार म्हणून पाचपुते असतील अशी घोषणा केली. त्यावरून महाविकास आघाडीत खडाखडीला सुरुवात झाली. त्यातच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांचे कान टोचले. त्यानंतर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारमुळे पालक-विद्यार्थी देशोधडीला लागणार कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा महायुतीचा निर्णय

राज्यातील खाजगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने तात्काळ स्थगित करावा. कारण महायुती सरकारने असंविधानिकपणे, कायद्याची पायमल्ली करुन आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन हा निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आर्थिक …

Read More »

राहुल गांधींना धमक्या देणाऱ्या तालिबानीवृत्तीच्या विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन वाचाळवीरांना भाजपा युतीने लगाम घालावा

विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्या सताधारी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या बेताल नेत्यांविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना भाजपा-शिवसेनेने आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मीरा भाईंदर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची टिका,… घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’: नाना पटोले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत त्यामुळेच …

Read More »