Tag Archives: विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, कर्जमुक्तीच्या अटी दिलासासाठी की, कर्जाचा विळखा घटट् करण्यासाठी कर्मजाफी योजना शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक

महायुती सरकारची कर्जमाफी योजना म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. यात सरकारने टाकलेले अटी शर्तींचे जाळे पाहिले तर ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे की त्यांच्याभोवती कर्जाचा विळखा अधिक घट्ट करण्यासाठी आहे हा प्रश्न पडतो. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले पीक …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, देशात लॉकडाऊन सारखी स्थिती… आरसी बुक बघून इंधन देण्यात येत असल्याचा आरोप

देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने होरपळत असताना भाजपा सरकार मात्र धार्मिक ध्रुवीकरण, इव्हेंटबाजी आणि भावनिक मुद्द्यांच्या आड आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. इंधन तुटवडा आणि वाढत्या दरांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवत विजय वडेट्टीवार म्हणाले, वाहनाचे आरसी बुक …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय? जागतिक बाजारात क्रुड ऑईल स्वस्त झालं की सरकार मौनात जातं

ब्रेंट क्रूड आंतरराष्ट्रीय बाजारात $१००  च्या खाली घसरलंय, कच्चं तेल स्वस्त झालंय. पण भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत! गेल्या १० दिवसांत इंधन दरवाढ तब्बल ७ रुपयाने झालीये. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाच्या सरकारला केला. विजय …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, मुख्यमंत्री कितीही खोट बोलत असले तरी…हेच सत्य वाशिम जिल्ह्यांत इंधन टंचाई आहे हे सत्य

मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, जर …

Read More »

अहिल्यानगर- चंद्रपूरला जिल्हाधिकारी कार्यालय ५० कोटीच्या आत मात्र नागपूरात १०० कोटीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार पहिल्या अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्या नगरमध्ये नवे जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिल्यानगर मात्र पूर्वीचे अहमदनगर येथे इमारतीची उभारणीही केली. त्यासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी रूपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचधर्तीवर राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने उभारायचे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आज केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, परिवहन विभागातील निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, चाकणकर यांचा राजीनामा झाला, पण मोठ्या माशांवर कारवाई झाली पाहिजे भोंदूबाबा खरात याचे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू, पोलिसांवर तपास करताना दबाव

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि खरात प्रकरणातून समोर आलेली मंत्र्यांची भोंदूगिरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची भीती, राज्यात गॅस टंचाईमुळे चूल विझण्याची वेळ सरकारने जनतेची दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, विधानसभेत मागणी

राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, जर खरा इतिहास शिकवला असता तर ही वेळच आली नसती… हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून केली टीका

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतान यांचा लावण्यात आलेला फोटो काढल्यावरून म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामापासून प्रेरणा घेत टीपू सुलतान यांनीही इंग्रजाच्या विरोधात काम केले असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून टीपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजासोबत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, अभिभाषणात जुन्याच मुद्याची घासून पूसून उजळणी राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक

राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात  जुन्याच  मुद्द्यांची घासून-पुसून  उजळणी केली असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी  जळजळीत  टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते  विजय वडेट्टीवार यांनी  बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना …

Read More »