Tag Archives: विधानसभा निवडणूक

पद सोडण्यासाठी राज्य सरकारचा दबाव, दोन आयएएस अधिकारी… केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर राज्यातील निवडणूक मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार घटवण्याचे प्रयत्न

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या काम करण्याच्या पध्दतीवर संपूर्ण देसभरातूनच अविश्वास व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणूकीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश बाजूला सारत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार त्यात बदल करत आयत्यावेळी नवा अध्यादेश जारी केला. तसेच विविध पातळीवरून निवडणूक आयोगाचे काम संशयातीत राहिले. …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले?

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच महाविकास आघाची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा इशारा, लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका… विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोमाने काम करा

काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर मागील काही दिवसात टीका होत होती परंतु लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलले आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष बनला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले आहे पण पुढील लढाई सोपी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे. लोकसभा जिंकलो …

Read More »

विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करा इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी काँग्रेसचे आवाहन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी केले. …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच… मुख्यंमत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यास नकार

लोकसभा निवडणूकीनंतर येत्या ऑक्टोंबर-नोंव्हेबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही यश मिळेल अशी अटकळ महाविकास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य …

Read More »

राज ठाकरे यांचे आवाहन, जातीपतीचे विष कालवणाऱ्यांना दूर करा मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आवाहन

विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास अद्याप तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभआ निवडणूकीत लागलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षाकडूनही आता विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर आज मनसेच्या पादधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत, समाजामध्ये जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावे, कारण यातून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार, नरेंद्र मोदींनी तयार केलेले नॅरेटीव्ह नव्हते का? महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या इंडिया आघाडीवर टीका करताना घरातून नळ तोडून नेतील, मंगळसुत्र काढून घेतील, घरातील म्हैस ओढून नेतील या सारख्या अनेक गोष्टी बोलल्या. तसेच यापूर्वी अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या बँख खात्यात १५ लाख रूपये देणार यासह अनेक मोठमोठ्या घोषणा करत भाजपाने आणि मोदी यांनी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, जागावाटप मेरिटनुसार झाले तरच मविआचा फायदा नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे …

Read More »

शरद पवार यांचा थेट इशारा, मला सरकार बदलायचय, चार-सहा महिने थांबा इंदापूर आणि पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना दिला इशारा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अपराजित म्हणून असलेल्या भाजपाला बहुमताच्या जवळपास फिरकू न देण्याचे आव्हान देशभरातील विरोधकांनी केले. इंडिया आघाडीने भाजपा आणि भाजपा प्रणित आघाडीला २९० जागांवर रोखले. तर काँग्रेसला ९९ जागांवर तर इंडिया आघाडीला २३५ जागांवर रोखले. तर त्यातच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी भाजपा प्रणित महायुती सरकारला तर १७ जागांवर रोखत …

Read More »