Tag Archives: विधानसभा निवडणूक

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, परस्पर उमेदवार जाहिर करायला परवानगी नाही संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी टोकले

नुकतेच श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीगांदा येथील शिवसेना उबाठाचा उमेदवार म्हणून पाचपुते असतील अशी घोषणा केली. त्यावरून महाविकास आघाडीत खडाखडीला सुरुवात झाली. त्यातच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांचे कान टोचले. त्यानंतर …

Read More »

सत्यपाल मलिक यांचे भाकित, निवडणूकीत भाजपाचा सुपडा नाही अंताची सुरवात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यानंतर भाजपाचा राजीनामा देत भाजपाच्या दुट्टपी भूमिकेची सातत्याने पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यातच आज माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मातोश्री निवासस्थानी जात शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत हे ही उपस्थित होते. सत्यपाल मलिक …

Read More »

वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाहिर जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध , युतीचे अधिकृत नावही जाहिर करणार

विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होण्याला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडून आघाडी, जागा वाटप आदी प्रश्नांमध्ये व्यस्त आहेत. तसेच एकाही राजकिय पक्षाने किंवा महायुती-आघाडीने अधिकृत जागावाटपाची चर्चा जाहिर केलेली नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र विधानसभा निवडणूकीचे उमेदवार जाहिर करण्यात आघाडी घेतली …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान …

Read More »

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रवेश केला

काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणूकीत उभा राहणार असल्याची घोषणा माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केली होती. तसेच त्यासाठी एखादा राजकिय पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरु असल्याचे सांगितले. मात्र आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संजय …

Read More »

राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा श्रीनगर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

श्रीनगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या सरकारच्या वचनाचा पुनरुच्चार करत लोकांना आश्वासन दिले की भाजपा ही वचनबद्धता पूर्ण करेल. जम्मू-काश्मीरला दहशतवादमुक्त करण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील बंपर मतदानाने दगडफेक आणि दहशतवादाबद्दल सहानुभूती …

Read More »

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी ५८ टक्के मतदान निवडणूक आयोगाने दिली माहिती

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी ९० पैकी २४ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरू असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.१९ टक्के मतदान झाले. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी एकत्रित येणार ? वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात चर्चा

आगामी विधानसभा निव़डणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही पक्षांशी वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहे. प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या …

Read More »

बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती, मतदारसंघ शिवसेनेचा, अन् उमेदवार… भाजपाच्या हस्तक्षेपावरून सरळ सरळ टीका

काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला अवध्या १८ जागा मिळाल्या. या अठरा जागांना भाजपाचे धोरण कारणीभूत ठरल्याची चर्चा तेव्हापासून राज्याच्या राजकारणात आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाने नाशिकचा उमेदवार जाहिर केला म्हणून पुढील कोणताच उमेदवार शिवसेना शिंदे गटाने जाहिर करायचा नाही अशी बंधने भाजपाने शिवसेनेवर घातल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे सूचक विधान,…निवडणूक जम्मू काश्मीरचे भवितव्य ठरविणारी काँग्रेस नेते राहुल गांधी फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्तींवर केली टीका

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि सत्ताधारी भाजपाकडून प्रचारसभांचे घेत स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी येथील प्रचारसभेत बोलताना दहशतवाद शेवटची घटका मोजत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आज प्रचारसभा जम्मू काश्मीर मधील …

Read More »