Tag Archives: शेतकरी

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

राज्यात सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीजपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सदाभाऊ …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट, सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ

शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रपरिषदेत विरोधी …

Read More »

नितेश राणे यांची माहिती, आंबा-काजू उत्पादक, मच्छीमारांसाठी वाढदिवस साजरा करणार नाही पाऊस लांबला, पाणीटंचाई

कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजी होणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी, …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुंबई येथून …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, कर्जमुक्तीच्या अटी दिलासासाठी की, कर्जाचा विळखा घटट् करण्यासाठी कर्मजाफी योजना शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक

महायुती सरकारची कर्जमाफी योजना म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. यात सरकारने टाकलेले अटी शर्तींचे जाळे पाहिले तर ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे की त्यांच्याभोवती कर्जाचा विळखा अधिक घट्ट करण्यासाठी आहे हा प्रश्न पडतो. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले पीक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कर्जमाफी निव्वळ धुळफेक, ५० % पेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार फडणवीस सरकारने आधी ८० लाख लाडक्या बहिणींना निकष लावून अपात्र ठरवले, आता शेतकऱ्यांचीही नियम लावून घोर फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. या योजनेमध्ये शब्दच्छल करून नियम, अटी व शर्ती टाकून जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवलेले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

पंकजा मुंडे यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर राज्य शासनाचा भर कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून राज्यातील पशुपालन व्यवसायाला भरभराटी आणावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले. ‘कारगिल’ कंपनीने ‘सिजेंटा फाउंडेशन इंडिया’ आणि ‘डिजिटल ग्रीन इंडिया’ यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात ‘एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम’ सुरू केला आहे. मंत्रालयात आयोजित या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. विभागाचे सचिव एन. रामास्वामी, कारगिल इंडियाचे …

Read More »

विलास तरे यांची मागणी, परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन करावे भारताचा परकीय चलन साठ्यात वाढ करण्यासाठी केली मागणी

भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ होण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी केले. पालघर येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आदेश, शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती दूर करा शेतकऱ्यांच्या ८ अ उताऱ्यावरील क्षेत्राची नोंद फार्मर आयडीवर घ्या

राज्यातील कृषी क्षेत्राच्या डिजिटलायझेशनसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत  फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती संबधित सर्व यंत्रणांनी दूर कराव्यात, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. विधानसभा सदस्य विजयसिंह पंडीत यांनी शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती दूर करण्याबाबत लक्षवेधी …

Read More »

आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजू शेट्टी, राऊत, सपकाळ यांचे मंत्रालयाजवळ आंदोलन राजू शेट्टी, विनायक राऊत, हर्षवर्धन सपकाळ यांची पोलिसांकडून धडपकड

आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या वेळी मोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्या राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वर्षा बंगल्याकडे जाण्याच्या मार्गावर मोर्चा सुरु होण्याच्या आधीच सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू शेट्टी यांनी …

Read More »