दत्तात्रय भरणे यांचे आदेश, शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती दूर करा शेतकऱ्यांच्या ८ अ उताऱ्यावरील क्षेत्राची नोंद फार्मर आयडीवर घ्या

राज्यातील कृषी क्षेत्राच्या डिजिटलायझेशनसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत  फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती संबधित सर्व यंत्रणांनी दूर कराव्यात, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

विधानसभा सदस्य विजयसिंह पंडीत यांनी शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती दूर करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती यासंदर्भात बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, सचिव परिमल सिंह, व्हिृसीव्दारे कृषि आयुक्त सूरज मांढरे,ॲग्रीस्टॅकचे संचालक अंकुश माने, उपसचिव श्रीकांत आंडगे, यासह बीड जिल्ह्यातील अधिकारी  बैठकीला उपस्थित होते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदार संघातील फार्मर आयडी संदर्भातील त्रुटींवर तातडीने संबधित सर्व कार्यान्वयिन यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. शेतकऱ्यांच्या ८ अ उताऱ्यावरील क्षेत्राची नोंद फार्मर आयडीवर घ्यावी. मोबाईल नंबर जर चुकीचा असल्यास त्यात दुरूस्ती करावी.ज्या शेतक-यांच्या नावावर जमीन आहे त्याचेच क्षेत्र नोंद करावी. या तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा.या अडचणी सोडविण्यासाठी विशेष कॅम्पचे सर्व विभागांच्या समन्वयातून शिबीर आयोजित करून प्रश्न सोडवावा असे निर्देश  दिले.

About Editor

Check Also

अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमातच कर्जमाफीबाबत कृषी मंत्री भरणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र मौन

मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफी घोषणेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *