मुंबई : प्रतिनिधी तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. …
Read More »अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: फि मध्ये २५ टक्के सूट सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा- मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रूपयांची (अंदाजे २५%) सूट देण्यात येत असल्यची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. क्रांतीज्योती …
Read More »इलेक्ट्रीक वाहनांची चार्जिंग स्टेशन उभी राहणार : धोरण मसूदा सादर करा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस परिवहन मंत्री ॲड.अनिल …
Read More »मुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, मी तुम्हाला सुचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खुप चांगली माहिती मिळाली आहे. ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खुप …
Read More »राज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येईल. “हेरिटेज ट्री” ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठीचा …
Read More »मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका
मुंबई: प्रतिनिधी मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. यावरुन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी १०७%..कधी १०४%… …
Read More »शेलारांचे आव्हान… शिवसेना को परास्त करने भाजप तयार है शिवसेना पळवाटा शोधण्याचा प्रयत्नात
मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ३० वॉर्ड असे आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. निवडणूक ही रणांगण असते आणि म्हणूनच जुन्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण करुन देतो असे सांगत ते म्हणाले की, ‘बंदूक भी तेरी, गोली भी …
Read More »लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राज्य सरकारला सवाल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नसल्याने राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का, असा सवाल प्रदेश भाजपाचे …
Read More »वाघांसाठी दोन गावांचे पुर्नवसन करा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी अलीकडील काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या ३१२ वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आतील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील पण वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे …
Read More »मुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये बदल करून मच्छिमार बांधवांना मदत करणे आवश्यक आहे, असे मत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देऊन हा मच्छीमारांचा आक्रोश समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. चक्रीवादळामुळे …
Read More »
Marathi e-Batmya