Tag Archives: bihar

ठरलं, नितीशकुमार पु्न्हा मुख्यमंत्री तर भाजपाचे हे दोन आमदार उपमुख्यमंत्री

बिहारमधील राजकिय उलथापालथीला अखेर दृष्यरूप येत असून भाजपाची साथ सोडून इंडिया आघाडीत सहभागी झालेले बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीनकुमार यांनी पुन्हा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन केलेल्या सरकारचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपा आणि जीतनराम माझी यांच्या पाठिंब्यावर नव्या सरकार स्थापनेचा दावा केला. या नव्या …

Read More »

नीती आयोगाचा सर्वात मोठा दावा, २४.८ कोटी नागरिक दारिद्र्य रेषेतून बाहेर

कोरोना काळापासून देशातील प्रमुख आर्थिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झालेल्या असताना आणि वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने कोरोना काळापासून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत अन्न पुरवठा करण्याचा निर्णय घेत ८० कोटी नागरिक या मोफत धान्याचा लाभ घेत असल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहेत. त्यातच आज केंद्र …

Read More »

भारत, बिहारमधील माहितीमुळे अस्वस्थ झाला देशाने जातीय विषमतेवर मौन धारण

आधी आमचा एक्स-रे होता, आता आमचा एमआरआय आहे. बिहारमधील जात ‘जनगणने’ डेटाच्या पहिल्या फेरीने जाती गणना शक्य आणि उपयुक्त असल्याचे सिद्ध केले, तर डेटाच्या दुसऱ्या टप्प्याने आजच्या भारतातील सामाजिक विषमतेचा सामना करण्यासाठी राष्ट्रव्यापी जात जनगणना आवश्यक आहे हे नि:संशयपणे स्थापित केले आहे. ज्यांना पुराव्याची गरज आहे त्यांच्यासाठी, बिहारमधून नुकतीच जाहीर …

Read More »

अशोक चव्हाण यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा

बिहार राज्याने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के केली आहे, बिहार भाजपानेही याला पाठिंबा दिला असून आता महाराष्ट्रात देखील बिहारप्रमाणे आरक्षण मर्यादा वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण म्हणाले, बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक कालच मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील ही मागणी होवू लागली …

Read More »

मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या बिहारी लोकांच्या संख्येत मोठी घट; बिहारच्या मंत्र्यांचा दावा महामारी संपल्यानंतर बिहारमध्ये परतलेल्या लोकांच्या तुलनेत मुंबईत परतणाऱ्यांची संख्या कमी

बिहारमधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली असून बिहारमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी १५ लाखांहून अधिक कामगारांनी नोदणी केली असल्याचा दावा बिहारचे मंत्री समीर महासेठ यांनी आज मुंबईत केला.. कोरोनानंतर आपापल्या घरी परतलेल्या बहुतांश लोकांनी आता बिहारमध्ये राहून रोजगार सुरू केला आहे आणि उदरनिर्वाहासाठी …

Read More »

बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी

देशात ओबीसीला आरक्षण १९९० पासून बी.पी. मंडल आयोगामुळे लागू करण्यात आले. भाजपा सरकारने आरएसएसच्या मनुवादी संस्कृतीच्या दबाव तंत्रामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मोहीम आखल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी जनगणना करण्यात आली. त्यामध्ये ओबीसीचा डाटा देण्यासंदर्भात वेळ काढून धोरण …

Read More »

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मोठे वक्तव्य, मरण पत्करू पण भाजपासोबत जाणार नाही एनडीएत गेलो ही एक मोठी चूक

बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र भाजपाने महाराष्ट्रात ज्या पध्दतीने शिवसेनेत फूट पाडून भाजपाने शिंदे-फडणवीस सरकार बनविले. त्यामुळे बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या पक्षावर महाराष्ट्र पॅटर्नचा अवलंब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची कुणकुण लागताच नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रीय जनता दलासोबत …

Read More »

आदित्य ठाकरे निघाले बिहार दौऱ्यावर

शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचा दौरा केलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आता एकदिवसीय बिहारच्या दौऱ्यावर उद्या बुधवारी जात आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भेट घेणार असल्याची माहिती उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिली. यावेळी आदित्य …

Read More »

नितीशकुमार यांनी घेतली आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ महागठबंधन सरकारमध्ये आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली. नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव …

Read More »

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींना हादरा, भाजपाबरोबरील नितीश कुमार यांचा संसार मोडीत काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणार

महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना सोबत घेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना केली. तर दुसऱ्याबाजूला बिहारचे नितीश कुमार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री पदावर बसवित भाजपाने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संयुक्त जनता दल आणि …

Read More »