मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र ‘टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने रक्षाबंधनानिमित्त एकत्र आणले. सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे रक्षाबंधन उत्साहात झाले.

बालगृहांमध्ये आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्याचा अनोखा क्षण ठरला. विविध बालगृहांमधून आलेली भावंडे एकमेकांना भेटताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना प्रेम, सुरक्षितता, आपलेपणा आणि एकमेकांच्या सहवासाची जाणीव अनुभवता आली. भावंडांनी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत हा दिवस आनंदात साजरा केला.

‘टीम अवर चिल्ड्रन्स’च्या या उपक्रमामुळे बालकांना कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनेचा अनुभव मिळाला. बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद हाच या सोहळ्याचा खरा उद्देश व यश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

About Editor

Check Also

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल दही हंडीच्या दिवशी जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरमधील रुग्णालयातील घटना

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *