Tag Archives: chief minister

वर्षा गायकवाड यांची मागणी, ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करा विवाह आणि विवाहाशी संबधित कामे खोळंबली

महाराष्ट्रात ख्रिश्चन विवाह निबंधक (Registrar) नसल्याने या समाजातील विवाह व विवाह संबंधित कामे खोळंबली आहेत. विवाद निबंधक नसल्यामुळे मुंबई विभागाला प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कामगार कायद्यांमधील सुधारित बदलांनुसार व्यापक ‘कामगार हिताला’ प्राधान्य द्यावे विविध कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांचे सादरीकरण

कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक ‘कामगार हित’ जपण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुल राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उडाण पुलाच्या बांधमांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी …

Read More »

ओमर अब्दुल्ला यांचा आरोप, नॅशनल काँन्फरन्सच्या आमदारांना भाजपाकडून २०-३० कोटी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न

जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन लोटस’च्या हालचाली सुरु असल्याची चर्चा शुरु असून त्या पार्श्वभूमीवर , मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आरोप केला आहे की, भाजपाने त्यांचे सरकार पाडण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शनिवारी श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दावा केला की, भाजपाचे एक …

Read More »

देशातील सर्वात मोठे ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन सेंटर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शने, परिषदा याकरिता कन्व्हेंशन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अ‍ॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीचा लाभ

अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना आपल्या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीने मला तंदुरुस्त होता आले. या ज्ञानशाखेच्या विस्तारासाठी व याचे शैक्षणिक मार्ग वृद्धींगत व्हावेत, या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून शासकीय पातळीवर कोठेही कमतरता पडणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक, संयुक्त समितीकडे पाठवा विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्ती नसाव्या, विश्वस्त मंडळावरील सदस्यांना भत्ते देऊ नये

विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावर चर्चा करताना काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांनी विधेयकातील अनेक तरतुदींवर गंभीर आक्षेप नोंदवत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रभू रामचंद्रांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा आणि भक्ती आहे. त्यामुळे रामटेकसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी तपास पथक विविध विभागातील तज्ञांचा समावेश करणार

नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशी करण्यात येत आहे. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असून त्यात विविध विभागांतील तज्ज्ञांचा समावेश असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही

सरकारच्या भ्रष्ट कामावर सर्वसामान्य जनता व विरोधी पक्ष बोलत असेल तर त्यांना ‘भाडे के तट्टू’, ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना शोभत नाही. जनतेच्या पैशाच्या हिशोब जनता विचारणारच, त्याचा एवढा राग येण्याचे काही कारण नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बघून घेण्याची जी भाषा केली ती अत्यंत …

Read More »