आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण करण्यात यावे. तसेच, शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्ग खोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर भर शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा
शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या अनुषंगाने या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, सोयी सुविधा, विद्यार्थ्यांची प्रवेश स्थिती अभ्यासाचे मूल्यमापन याबाबत त्यांनी मंत्रालयात मंगळवारी आयोजित बैठकीत …
Read More »काँग्रेसचा आरोप, शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी, भविष्य उद्ध्वस्त करून पैसे कमावण्याचा धंदा विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्याबद्दल थँक्यू मोदी अभियान आहे का? झिनत शबरीन
नीट पेपर फुटी प्रमाणेच राज्यात सीईटी व टीईटीचे पेपर फुटले आहेत, याचा ६ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. भाजपा सरकारच्या नालायकपणामुळे लाखो विद्यार्थी व पालकांना मनस्ताप झाला असून त्यांच्या स्वप्नांवर वरंवटा फिरवला आहे पण शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. येत्या ७ दिवसात शिक्षण मंत्री दादा भुसे …
Read More »टीईटी TET पेपरफुटी विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकावले ‘दादा भुसे राजीनामा द्या’ पोस्टर; ‘पेपरचोर गद्दीछोड’च्या घोषणांनी परिसर दणाणला
राज्यातील टीईची TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. नीट NEET नंतर आता टीईटी TET चा पेपर फुटला आहे. प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटत आहेत. …
Read More »शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती, टीईटी पेपर फुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल दोषींवर कठोर कारवाई केली जाईल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली ‘शिक्षण पात्रता परीक्षा’ (TET) २०२६ पेपरफुटीची घटना घडल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. …
Read More »शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ
राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यादरम्यान उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील …
Read More »अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा
राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवेश …
Read More »अमोल मातेले यांची माहिती, ज्युनिअर कॉलेज-खासगी कोचिंग क्लासेस प्रकरणी मंत्री दादा भुसे यांची भेट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट – चालू शैक्षणिक वर्षात कार्यवाहीचे आश्वासन
मंगळवार १९ मे २०२६, राज्यभरात नीट NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील विविध अनियमितता व खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय …
Read More »१२ वीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के : सर्वाधिक निकाल कोकणचा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५ ने जास्त
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन करीत विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी, या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेत ४०५ शाळा विकसित करणार विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार
राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी …
Read More »
Marathi e-Batmya