छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण
राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे एकाच गावात नांदणारे मराठा व ओबीसी बांधव यापुढेही गुण्यागोविंदाने नांदतील व …
Read More »राज्यपालांच्या अभिभाषणाने विशेष विधिमंडळ अधिवेशनाची सुरूवात
शेतकरी, कामगार, युवकांसह सर्वच समाजघटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन काम करीत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. रोजगार निर्मिती, उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक यामध्येही भरीव वाढ झाली असून २०२७-२८ पर्यंत देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी अनुरूप अशी राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी …
Read More »जयंत पाटील एकाच वाक्याच उत्तर, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही संपर्क केला नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील अशा बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र जयंत पाटील यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत या बातम्यांची हवाच काढली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत म्हणाले की, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही …
Read More »सुप्रिया सुळे यांचा उपरोधिक सवाल, आता त्यांना आमचे लोकही हवे आहेत….
भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, रायगडाप्रमाणे शिवनेरीचाही विकास करणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटनस्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा निवासस्थान येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा …
Read More »नागपूरच्या विकासासाठी १ हजार ८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १ हजार ८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरिता अमृत टप्पा दोन मधून मलनि:स्सारणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश …
Read More »अशोक चव्हाण यांनी नव्याने धारण केले कमळः काँग्रेस नेमकी चाललीय कुठे?
मागील काही काळापासून अशोक पर्व आणि कफ परेडला लागून असलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीवर आदर्श नामक इमारतीतील सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला हात काँग्रेसच्या हातातून सोडवून घेत (राजीनामा देत) भाजपाचे कमळ नुसतेच हाती नाही धरले तर अंगावर धारण केले. …
Read More »काँग्रेस नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो…
सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे दोखो होता है क्या… असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वाँर्ड क्र ८२ मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya