Tag Archives: devendra fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, कचऱ्यापासून सीबीजी प्रकल्पांसाठी टास्क फोर्स स्थापन करा सीबीजी धोरणानुसार आवश्यक त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे निर्देश

राज्यातील शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मितीला चालना देण्यासाठी प्रकल्प उभारणीसंदर्भात टास्क फोर्स स्थापन करण्यात यावेत. ज्या ठिकाणी शक्य आहे, तेथे राज्याच्या सीबीजी धोरणानुसार प्रकल्प उभारावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कचरामुक्त शहरे आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पांबाबत आयोजित बैठकीत प्रस्तावित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा विकासकामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरा-मोहरा बदलणार विविध विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या कामांमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच भाविक, पर्यटक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर तंत्रज्ञानाधारित दुष्काळी मदतीचे नियोजन याला प्राधान्य, केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबतच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जलसंधारणाच्या कामांचे प्रभावी नियोजन करण्याबरोबर तंत्रज्ञानाधारित संनियंत्रणावर भर द्यावा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती करण्यात आलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हे जागतिक पटलावर …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलकडून मोठ्या सुधारणांना हिरवा कंदील या गोष्टींमध्ये सुधारणेस मान्यता

५७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चे पालन करणे सोपे करणे, परतावा जलद करणे आणि कर अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप कमी करणे या उद्देशाने प्रक्रिया सुधारणांच्या एका व्यापक संचाला मंजुरी देण्यात आली आहे. सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे परतावा प्रक्रियेत आहे. परताव्याच्या दाव्याची पोचपावती देण्याची कालमर्यादा १५ …

Read More »

अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

राज्यातील अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन ६ ऑगस्ट २०२६ रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायको ट्रॉपिक सब स्टान्सेस ॲक्ट अंतर्गत पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री …

Read More »

उच्च न्यायालयाने एमपीएससी आंदोलन प्रकरणाची दखल घेत, विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार परिक्षा निश्पक्षपणे आणि गैरप्रकाराशिवाय घेणे हे राज्य सरकारचे कर्तव्य

सार्वजनिक भरती परीक्षा निष्पक्षपणे आणि कोणत्याही गैरप्रकारांशिवाय घेतल्या जातील, याची खात्री करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना नोंदवले [अमित सुपेकर व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर]. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांबाबत पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनांच्या …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील दुष्काळी उपाययोजनांमध्ये शेतकरी व शेतमजुरांना सर्वोच्च प्राधान्य • मंत्रिमंडळ उपसमितीकडून पीक कर्ज, पाणी, चारा नियोजनाचा आढावा

दुष्काळग्रस्त भागांतील पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसेच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत वडार समाजाला मोठा दिलासा, गौण खनिज उत्खननाची मर्यादा दोनशेवरून पाचशे ब्रास करण्यास मंजुरी, अधिनियमात सुधारणा करणार, सीएम सृष्टी योजना : विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाला चालना मिळणार, अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील …

Read More »