Tag Archives: devendra fadnavis

रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांना टोला

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर लिहिताना किंवा बोलताना एखादी व्यक्ती इतकी उथळपणा कसा करू शकते, तेही न्यायालयात झालेल्या सुनावणीचे ‘प्रोसेडिंग’ न वाचता आणि न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा एक भक्कम स्तंभ असताना असे सांगत रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! दुर्लक्षितपणा की, ठरवून केलेली बदनामी? असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना …

Read More »

आता फक्त याच कारणामुळे होणार सरकारी बदली….अन्यथा नाही राज्य सरकारकडून नवा आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या उशीराने करण्यात आल्या होत्या. तसेच यंदाच्या नव्या आर्थिक चालु वर्षात आपल्या इच्छेच्या, आवडत्या ठिकाणी किंवा रहिवासी असलेल्या जिल्ह्यात बदली व्हावी यासाठी प्रयत्न करण्यास अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नावर राज्य …

Read More »

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी दोन दिवसांचे वेतन देणार विविध संघटनांनी सरकारला दिले निवेदन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविधस्तरातून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकिय आणि निमशासकिय अशा विविध महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिकांसह प्राधिकरण सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक ते दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्याच्या सेवेतील आयएएस आणि आयपीएस अधिकारीही आपले दोन …

Read More »

न्यायालयाच्या मुंबई कौतुकानंतरही फडणवीस म्हणतात हे तर आभासी चित्र पीआर यंत्रणांमार्फत जनतेची दिशाभूल नको! हा खेळ थांबविण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच मुंबई महापालिकेचे मॉडेल म्हणून इतर महापालिकांनी वापरावे अशी सूचनाही न्यायालयाने केली. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कोरोना रूग्ण संख्येत फक्त आकड्यांचा खे‌ळ सुरु असल्याचा गंभीर आरोप करत हा खेळ थांबविण्याचे …

Read More »

प. बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका ! मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षातील काही मंडळी मराठा समाजाला चिथावणी देत असल्याची माहिती समोर येते आहे. राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आणणारा पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस हे आरक्षणच्या विरोधात; तर भाजपा दोन्ही बाजूने खेळतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात व मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने खेळतेय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारची संयुक्त …

Read More »

महाविकास आघाडीसरकारवर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील आणि फडणवीसांची टीका महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द

पुणे-नागपूर: प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीतील आरक्षण गमावले आहे. यामुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, अशी …

Read More »

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य ठरवित एखाद्या जातीला आणि जमातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे ठरविण्याचे अधिकार १०२ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने ३:२ या मताने निर्णय दिला. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण आता संपुष्टात आले. …

Read More »

आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! आरटीपीसीआर चाचण्याचे प्रमाण वाढवा-देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: प्रतिनिधी कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिला. गेल्यावर्षी …

Read More »

ब्रेक दि चेन निर्बंधातंर्गत नवे नियम लागू झाले पण प्रवास, रेल्वेने जायचाय: तर हे वाचा राज्य सरकारने केले लोकांच्या शंकाचे निरसन

प्रश्न १ – डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर – होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात. त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित …

Read More »