Tag Archives: pm narendra modi

डब्बे बदलण्यापेक्षा देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ ! रस्त्यावर चुली मांडून केला मोदी सरकारचा निषेध : नाना पटोले

पुणे : प्रतिनिधी मोदी सरकार मागील ७ वर्षात देश अधोगतीकडे घेऊन गेले आहे. ७० वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशाला विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले होते. परंतु मोदी सरकारने ७० वर्षातील हे वैभव अवघ्या ७ वर्षात विकण्याचा सपाटा लावला आहे. नोटबंदी, जीएसटीने मोठे नुकसान केले. महागाई, …

Read More »

केंद्रात फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह या १२ जणांचे राजीनामे घेतले प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, संतोष गंगवार, डॉ.हर्षवर्धन, निशांख, गहेलोत यांचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असलेल्या चर्चेला अखेर आज मुर्त स्वरूप आले आहे. नव्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकाश जावडेंकर यांच्यासह १२ जणांचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी घेतले. दिड वर्षापासून कोरोना काळात आपल्या मंत्री पदानुसार योग्य …

Read More »

जगणे महाग करणाऱ्या जुलमी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून गुरुवार ८ जुलैपासून दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या …

Read More »

ते वृत्त दिशाभूल करणारे; तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत हीच पक्षाची भूमिका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायदे पूर्णत: रद्द करण्याऐवजी त्यातील शेतकऱ्यांना अडचणीचे वाटणारे मुद्दे वगळून राज्यात सुधारीत कायदा आणावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डि.वाय.पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उद्घाटनानंतर दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. त्यावर विविध तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी यासंदर्भात …

Read More »

नीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील तज्ञांची सदस्य म्हणून नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या अनेक सदस्यांच्या समिचीचे सल्लागार असलेले आणि आयआयपीएम संस्थेचे संस्थापक कि-नोट स्पीकर डॉ.अरिंदम चौधरी यांनी केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणा विरोधात सोशल मिडीयातून चांगलाच …

Read More »

राफेलप्रकरणी फ्रांसमध्ये चौकशी होवू शकते तर देशात मोदी सरकार का घाबरते? राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये …

Read More »

न्यायालयाच्या निकालामुळे भाजपा नेत्यांच्या दाव्यातील फोलपणावर शिक्कामोर्तब मराठा आरक्षणचा रस्ता आता लांब पल्ल्याचा

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणाविरोधात निकाल देत मराठा समाज हा मागास नसल्याची टीपणी करत आरक्षण संपुष्टात आणले. त्यावर भाजपा नेत्यांनी आकाश पाताळ एक करत न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नसल्याचा आरोप करत आघाडी सरकारला आरक्षण देण्याची इच्छा नसल्याची टीका …

Read More »

भाजपाच्या मविआ विरोधाला आता काँग्रेसचेही २६ जूनला मोदी विरोधी आंदोलनाचे उत्तर मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलनः नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ओबीसी आरक्षणावरून भाजपा आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास सध्याचे महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपाने मविआच्या विरोधात २६ जूनला आंदोलनाचा इशारा दिला. त्यास प्रतित्तुर म्हणून आता काँग्रेसनेही ओबीसी आरक्षणच्या रद्द होण्यास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत २६ …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सहार आणि छ.शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीने अदानी एअरपोर्टला हस्तांतरीत केल्यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ५० टक्के मालकीही आता अदानी समुहाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून मालकी हक्क बदलास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सदरच्या मालकी बदलास केंद्रातील मोदी सरकारने यापूर्वीच मंजूरी दिल्याने …

Read More »