Tag Archives: pm narendra modi

शेतकरी आणि पुरग्रस्तांसाठी केंद्राकडे १४ हजार ६०० कोटींची मागणी अर्थमंत्री जयंत पाटील यांची सभागृहात माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरीता राज्य शासनाने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केल्याची माहिती अर्थ मंत्री जयंत …

Read More »

केंद्राला जाणारा लाखो कोटीचा कर माफ केल्यास महाराष्ट्र कर्जमुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी दरवर्षी एकट्या मुंबईतून ३६ ते ४० टक्के करापोटी आणि उर्वरीत महाराष्ट्रातून ४ ते ६ टक्के कर केंद्राला जातो. हा कर साधारणतः दिड ते बावने दोन लाख कोटी रूपयांच्या घरात असून हा कर माफ केल्यास संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होवू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार- पंतप्रधान मोदी यांची भेट मदत वाटपासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला सत्ता स्थापन करण्याकरीता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शिकाँराचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकिय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र या भेटीनंतर पवार यांनीच राज्यातील शेतकऱ्यांना …

Read More »

मंत्री रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मंत्र्यांवर …

Read More »

प्रचार थंडावला… शेवट दिवशी भाजपा, राष्ट्रवादी,काँग्रेस, मनसेकडून प्रचारात आघाडी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीकरीता ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता संपला. मागील २० ते २५ दिवस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने चांगलाच राजकिय धुराळा उडवून दिला. मात्र खऱ्या लढतीचे चित्र भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असेच प्रचारात दिसून आले. भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

आदिवासींच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे प्रतिपादन

नवापूरः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने आजवर आदिवासीचा वापर फक्त मतांसाठी केला. गेल्या पाच वर्षांत आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. आदिवासींचा विकास करण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे झालेल्या …

Read More »

अर्थव्यवस्था कमकुवत होण्यामागे विरोधक नव्हे तर सरकारचा निष्काळजीपणा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योग्य त्या उपाय-योजना करणे गरजे आहे. मात्र सरकारकडून फक्त विरोधकांवर टीका करण्यात येत असल्याने त्यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाय सापडत नसल्याची पलटवार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीस माजी पंतप्रधान …

Read More »

भारतातील मुलांपेक्षा नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तानातील मुलांना चांगले अन्न मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नाशिक – निफाडः प्रतिनिधी या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत. त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी प्रतीचे अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं, ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील …

Read More »

३५० एकर मिठागरांची जमिन आता लवकरच खुली होणार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबईः खास प्रतिनिधी सर्वांसाठी घरे या योजनेसाठी मुंबईतील एक हजार एकरहून अधिक असलेली मिठागरांची जमिन उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र त्यास तब्बल तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर राज्य सरकारला जाग आलेली असून ऐन निवडणूकीच्या धामधुमित ही जमिन खुली करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात इथे निवडणूक नाही..मग पंतप्रधान-गृहमंत्री कशाला येतायत ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल

अहमदनगर – राहुरीः प्रतिनिधी मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही… इथे विरोध करायला माणसंच नाहीत… निवडणूकीची मजा येत नाही… चांगली गोष्ट आहे निवडणूकीची मजा येत नाही तुम्हाला… मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात… विरोधकच नाही मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरुन २० सभा का घेतात… मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यात का हिंडतात असा …

Read More »