Tag Archives: ShivsenaOFC

राज ठाकरे- मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, एकनाथ शिंदे यांनी नियोजित बैठका केल्या रद्द अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठका आणि एमएसआरडीची आढावा बैठका पुढे ढकलल्या

मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफुस सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकिय सौख्य काही राहिल्याचे दिसून येत नसल्याची कुजबुज सध्या सुरु असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून महायुतीतील शिवसेना …

Read More »

शिंदेंकडून ३२ लाखांची मदत घेऊन आमदार शिवतारे शिरीष मोरेंच्या कुटूंबियांच्या भेटीला संत तुकाराम महाराजांच्या वारसाने केली होती आत्महत्या

तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना ३२ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे निर्देश, ड्रायव्हर, कंडक्टरसाठी वातानुकुलित विश्रांती गृह बांधा प्रत्येक एसटी स्टँडवर उपलब्ध करून द्या

एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!” समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना बंद होणार नाही महायुतीच्या सर्व ९ जागा विजयी करणाऱ्या नांदेडकरांचे मानले आभार

महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नांदेड येथे शिवसेनेकडून आयोजित केलेल्या आभार सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि येथे सत्याचाच विजय झाला. नांदेडी जिल्ह्यातील …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा… देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेल, कारण १२ लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने सर्वसामान्याना मोठा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …

Read More »

एसटी भाडेवाढीवरून दोन उपमुख्यमंत्र्यांचे परस्पर विरोधी विधानेः मात्र भाडेवाढ तर लागू अजित पवार म्हणतात, भाडेवाढीची फक्त चर्चाः तर एकनाथ शिंदे म्हणाले, चांगल्या सेवेसाठी भाडेवाढ

राज्यातील महायुती सरकारमध्ये बाहेरून कितीही सारं काही अलबेल असल्याचे चित्र टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दाखविण्यात येत असली तरी वास्तविक तशी परिस्थिती महायुतीतील नेत्यांमध्ये तशी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच एसटी भाडेवाढीवरून मुख्यमंत्री पदानंतर महत्वाचे असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र मते-मतांतरे असल्याचे दिसून येत आहे. पंरतु या दोघांच्या …

Read More »

राहुल शेवाळे यांचे वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर, येत्या २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २३ जानेवारीला मुंबईत सत्कार सोहळा

शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले की, उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून येत्या २३ जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होईल. त्यामुळे धास्तावलेले विरोधक शिवसेनेबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. उदय कोणाचा होणार यावर चर्चा करण्यापेक्षा उबाठा गटाच्या अस्ताबाबत …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाला डिवचले, जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना… नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचा खोचक टोला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ …

Read More »

वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट, राजन साळवी आणि मला ऑफर….. लोकसभा निवडणूकीनंतर आलेल्या ऑफरची माहिती

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका पार पडून त्यातून निवडूण आलेले सरकारही स्थानापन्न झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी विविधस्तरावरून कशा ऑफर देण्यात येत होत्या याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना …

Read More »