Tag Archives: ShivsenaOFC

आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचे समन्स सदानंद सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

माहिम विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सांवत यांच्या आमदाराकीला शिंदे गटाचे सदानंद सरवणकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने महेश सावंत यांना शुक्रवारी समन्स बजावले आहे. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले. उच्च न्यायालयाच्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर सदा सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर …

Read More »

वक्फ बोर्ड निधीः शिंदे यांच्या काळात वाद, तर फडणवीसांच्या काळात निधी देऊनही शांतता आता कोण आंदोलन करणार, भाजपाशी संबधित कोणी बोलेचना

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडून आणि विविध राज्यातील राज्यांच्या सरकारकडूनही मुस्लिम धर्मियांना उद्देशून सातत्याने टार्गेट करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यातच महाराष्ट्रातही नव्याने सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून आणि त्यापूर्वीही भाजपाचे आमदार आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे ही  सातत्याने मुस्लिम धर्मिय लोकांना उद्देशून चितावणीखोर वक्तव्य करत असतात. मात्र …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, नीलम गोऱ्हे यांचे ते वक्तव्य मुर्खपणाचे, यायलाच पाहिजे नव्हते ठराविक कालवाधीतील पक्षांचा कालावधी पाहता असे वक्तव्य करायला नको होते

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना उबाठामध्ये पदांसाठी अप्रत्यक्ष भ्रष्टाचार होत असल्याचे टीका केली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली. तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी बोलावे असे आव्हानही केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी …

Read More »

सुषमा आंधारे यांचा इशारा, नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल नीलम गोऱ्हे यांनी आतापर्यंत ज्या पक्षात प्रवेश केला तेथे कोणतेच काम केले नाही

एकेकाळच्या शिवसेना पक्षाच्या महिला उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्या आरोपावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर आज सकाळपासून टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. त्यातच सुषमा आंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा आज …

Read More »

संजय राऊत यांचा नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप, प्रश्न लावायला पैसे घेतात, माझ्याकडे पुरावे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते त्यांनी बोलावं

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल साहित्य संमेलनात कसा मी घडलो या मुलाखत वजा कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावर राज्याच्या राजकारणात पडसाद उमटल्यानंतर आज पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांच्यावर शिवसैनिकांसह संजय राऊत यांनी एकच हल्लाबोल केला. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर …

Read More »

नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, मात्र संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरावर सावध दिल्लीतील साहित्य संमेलनात आम्ही कसे घडलो कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांचा आरोप

९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी …

Read More »

हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणासाठी फडणवीस की ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि चौकशी

राज्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या दरीच्या कथित चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हलके न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना टाळाटाळ करणारे एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाचा संदर्भ देत …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ लॉटरीची ऑनलाईन सोडत ‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेल्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून अभिनंदन

सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ. आरोग्य संस्थामध्ये निर्माण होणार दोन हजार पद निर्मिती

राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार ७० पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना प्रकाश …

Read More »

पीएस, ओएसडीचे बँक खाते क्लिअर तरच पोस्टींग, अनेक मंत्री अद्यापही विना स्टाफच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नियमाने अजित पवार, एकनाथ शिंदे वगळता सर्वच मंत्री हैरान

राज्याच्या राजकारणात सत्तास्थानी विराजमान झालेल्या आणि मंत्री पदाचे नाव जाहिर झाल्यापासून संबधित मंत्र्यांकडे पीएस आणि ओएसडी पदावर वर्णी लागावी या साठी अनेक अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरु होते. पुढे त्या संबधित पीएस आणि ओएसडीच्या माध्यमातून त्या संबधित मंत्री आणि विभागात काय चालते याची वंदता सर्वतोमुखी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री …

Read More »