Tag Archives: st bus

एकनाथ शिंदे यांचे निर्देश, ड्रायव्हर, कंडक्टरसाठी वातानुकुलित विश्रांती गृह बांधा प्रत्येक एसटी स्टँडवर उपलब्ध करून द्या

एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!” समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन …

Read More »

एसटी प्रवाशांनी यूपीआयद्वारे तिकिटाचे पैसे द्यावे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले …

Read More »

एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न…. तिकीट दरवाढीला मान्यता द्या- सरकारकडे एसटीचा प्रस्ताव

दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी …

Read More »

दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोंबरला पगार रोखून धरलेली रक्कमही अदा करण्याचे निर्देश

दिवाळी सणानिमित्त आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचा पगार चालू महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचे वेतन जारी करण्यात यावे असे आदेश एसटी महामंडळाने आज जारी केले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी ऑक्टोंबर महिन्याचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा …

Read More »

हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”…. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली माहिती

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन एस. टी. …

Read More »

उत्पन्न वाढीसाठी एसटीच्या चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम

प्रवासी वाहतूक करीत असतांना महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून …

Read More »

एसटी ९ वर्षानंतर पहिल्यांदाच नफ्याच्या महामार्गावर राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे नफ्यात वाढ

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणारी एसटी ९ वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर धावू लागली आहे. आर्थिक संकटामध्ये रूतलेल्या एसटीने आता भरारी घेतली असून महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागेः मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला. यानिर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या …

Read More »

एसटी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांचा संप; २०० डेपोतील एसटीच्या वाहतूकीला ब्रेक शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यावर तोडगा निघेपर्यंत संप सुरुच राहणार

राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यावरती अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीचे निमंत्रक मुकेश तिगोटे यांनी माहिती दिली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक दिल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सणासुदीच्या तोंडावर …

Read More »

एसटीचे अभिनव ” जागा दाखवा ” अभियान.. अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेचे सहकार्य

राज्य शासनाने महिलांना सर्व प्रकारचे एसटी बस मधून प्रवास करताना तिकीट दरामध्ये ५०% सवलत दिली आहे. सध्या एसटीमध्ये ” महिला सन्मान योजना ” अंतर्गत लाखो महिला दररोज एसटीतून ५०% तिकीट दरात प्रवास करीत आहेत. परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ” सन्मान ” …

Read More »