अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतूकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या बांद्रा येथील कार्यालयात मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार विधान परिषदेत दिली माहिती
राज्याच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५’ अंतर्गत २०३५ पर्यंत राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. नियम २६० अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, वाढते …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण एसटी ताफ्यात तीन हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर
महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ मार्च २०२६ रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. या सोहळ्यास विधानपरिषदेचे …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया कोणताही हस्तक्षेप सहन न करता पारदर्शक पद्धतीने राबविल्यामुळे केवळ …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना (परमिट) बंधनकारक करण्याचा निर्णय ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक करणार असल्याची माहिती दिली
राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आधुनिक ‘बसपोर्ट’ एसटी डेपोच्या विकासाला गती मिळणार असल्याचा केला दावा
गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून एसटी महामंडळाच्या डेपो आणि बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी याविषयी विधान परिषदेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. परिवहन मंत्री …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका
राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही केली जाईल. शासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर वाहतूकदार संघटनांनी संप मागे घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील वाहतूकदार संघटनांनी ५ मार्च २०२२ पासून …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजना करणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजनासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून ठोस उपाययोजना करणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीवरून कळवा येथे बारावीचा पहिलाच पेपर देण्यासाठी जात असताना मुंब्रा – कळवा स्टेशन दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहम कटारे या विद्यार्थ्याचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा …
Read More »आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय
पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील २ वर्षांत एकूण २०० नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्यातील २७१ डेपो सार्वसनिक-खासगी सहभागातून विकसित होणार विधान परिषदेत बोलताना दिली माहिती
राज्यातील २७१ परिवहन डेपो सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम डेपोसोबत दोन ग्रामीण किंवा तालुका स्तरावरील डेपो अशा तीन डेपोचे एक पॅकेज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी …
Read More »
Marathi e-Batmya