दादर येथील डॉ.आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, वंचित बहुजन …
Read More »आंबेडकर-ठाकरे युतीवर शरद पवारांचे मोठे विधान सोमवारी वंचित आणि शिवसेना युतीची अधिकृत घोषणा
एकाबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेवर उभा दावा टाकला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा समावेश महाविकास …
Read More »वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नाही ठाकरे गटाशी आमची बोलणी सुरु आहे त्याबाबत उध्दव ठाकरे घोषणा करतील
स्व.प्रबोधनकारक ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना साद घालत युतीसाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे गटाशी युती करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वंचित आणि …
Read More »अंधेरी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेट अॅण्ड वॉच
सध्या राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन्ही गट कोणाची ताकद अधिक हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो का? निवडणूक आयोग तटस्थता जपेल का?
राज्यातील शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे चिन्ह कोणाचे यावरून सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुनावणी आहे. मात्र काल बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबतचा पुढील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेण्यास परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर बोलताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली. …
Read More »वंचितने पाठविली राज्य निवडणूक आयोगाला नोटीस “न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होता कामा नये”, वंचित बहुजन आघाडीने बजावली कायदेशीर नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास दिलेल्या आदेशानुसार पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार २ आठवड्यांच्या आत राज्यातील साधारण २४८६ स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत ५ मे रोजी एक परिपत्रक काढून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना प्रभाग रचनेचे कामकाज नव्याने सूरू …
Read More »राज्यपालांच्या “त्या” मंजूरीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ खटला चालविण्याच्या अर्जाला दिली परवानगी
काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना शासकिय निधीचा अपहार केल्याप्रकरणी चांदूर बाझार सत्र न्यायालयाने त्यांना दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुणावली. परंतु त्यांनी वरील न्यायालयात अपील करणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. परंतु वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांनी शासकिय निधीचा अपहार केल्याची तक्रार …
Read More »त्या १२ आमदाराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालच घटनाबाह्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर या निकालावरून भाजपाकडून स्वागत तर सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयालयाच घटनाबाह्य निकाल दिलासा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने राजकिय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. सोलापूरमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर …
Read More »वीज सवलतीवरून मनसे, भाजपा, वंचित आक्रमक नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करणारे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सततच्या घोषणेनंतर अचानक यु टर्न घेत वीज बिलात सवलत देता येणार नसल्याचे सांगत नागरिकांनी वीज बिले भरावीत असे आवाहन केले. त्यामुळे भाजपाचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनसे नेते बाळा नांदगांवकर आणि …
Read More »मंदिरे उघडा, वारकरी सांप्रदयाच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी पंढरपुरातील आंदोलनात सहभागी होणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, भजन कीर्तन करायला परवानगी दिली जावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला असून, ते स्वतः ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आयोजित आंदोलनाला पाठिंबा म्हणून सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदयातील साधु-संत त्याचप्रमाणे मठातील महाराज हे …
Read More »
Marathi e-Batmya